Anand Mahindra यांनी घोषित केला फिफा वर्ल्डकपचा विजेता, म्हणाले…!

Fifa World Cup On Screen Inside Operating Theatre: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ते सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेत असतात. नुकताच त्यांनी एका ऑपरेशन थिएटरमधील फोटो पोस्ट केला आहे. यात एका बाजूला शस्त्रक्रिया होत असताना रुग्ण आरामात झोपून टीव्हीवर फुटबॉल सामना पाहात असल्याचं दिसत आहे. हे दृष्य पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) प्रभावित झाले असून Note From Poland नं ट्वीट केलेला फोटो शेअर केला आहे. “फिफा आयोजक, तुम्हाला असं वाटत नाही का? ही व्यक्ती चषकासाठी प्रबळ दावेदार आहे.” त्याचबरोबर त्यांनी ही पोस्ट FIFAcom ला टॅग केली आहे. 

Note From Poland नं फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, “सदर व्यक्ती पोलंडमधील असून शस्त्रक्रिया सुरु असताना फुटबॉल वर्ल्डकप (Fifa Football World Cup) सामना पाहात आहे. हा फोटो ऑपरेशन सुरु असलेल्या SP ZOZ MsWia हॉस्पिटलनं शेअर केला आहे.” ऑपरेशन सुरु असताना सदर व्यक्ती फुटबॉल सामना पाहात होता. सदर व्यक्तीवर 25 नोव्हेंबरला सर्जरी करण्यात आली. तेव्हा त्या व्यक्तींना शस्त्रक्रियेदरम्यान सामना पाहू शकतो का? अशी विनंती केली. त्याची ही विनंती डॉक्टरांना मान्य केली आणि ऑपरेशन थिएटरमध्ये टीव्ही लावला गेला. 

हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, “खरं तर त्या व्यक्तीपेक्षा ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना ट्रॉफी दिली पाहीजे. त्यांनी मान्यता दिली नसती, तर हे शक्य नसतं.” दुसऱ्या एका युजर्सने लिहिलं आहे की, “ऑपरेशन थिएटरमधील ही गोष्ट आता कॉमन झाली आहे. ऑपरेशन करताना गिटार वाजवणं तर किती वेळा पाहिलं आहे.” तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “फुटबॉल स्पर्धेला किती क्रेझ आहे यावरून दिसून येतं.” 

हेही वाचा :  Gautami Patilचा व्हिडीओ व्हायरल होताच रुपाली चाकणकर भडकल्या; पोलिसांना दिले महत्त्वाचे आदेश

बातमी वाचा- FIFA WC 2022: ‘या’ संघांमध्ये रंगणार उपांत्यपूर्व फेरीचा थरार, कोणता सामना कधी? वाचा

फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. 32 पैकी आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यामध्ये क्रोएशिया, ब्राझील, नेदरलँड, अर्जेंटिना, मोरोक्को, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रान्स या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …