अक्षय कुमार-क्रिती सेनॉनची जबरदस्त केमिस्ट्री, ‘बच्चन पांडे’चं ‘मेरी जान’ गाणं रिलीज

Meri Jaan Song Out : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ (Bachchan Panday) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटातील ‘मेरी जान’ हे नवीन गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉनची (Kriti Sanon) रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणे पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली असेल.

‘मेरी जान’ हे गाणे गायक बी प्राक याने गायले आहे. बी प्राक याने यापूर्वीही अक्षय कुमारसाठी अनेक हिट गाणी गायली आहेत.

‘मेरी जान’ हे गाणे सुंदर लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे. गाण्याचे बोल जानी यांनी लिहिले असून, बी प्राक यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. आपल्या इंस्टाग्राम पेजवर हे गाणे शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले- ‘जिसके बुलाने पे बच्चन चले जाए, जिसके लिए बच्चन मरने को तैयार हो जाए। देखिए ऐसी भौकाल भरी मोहब्बत’

पाहा गाणे :

अक्षय, कृती व्यतिरिक्त या चित्रपटात अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत. ‘बच्चन पांडे’ आधी 4 मार्चला रिलीज होणार होता. पण, नंतर निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट पुढे ढकलली आणि आता तो होळीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 18 मार्चला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.

हेही वाचा :  Nagraj Manjule : 'झुंड'च्या यशानंतर नागराज मंजुळे लवकरच मिस्टर परफेक्शनिस्टसोबत करणार काम?

‘बच्चन पांडे’ हा 2014 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. यात अक्षय कुमार गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, क्रिती सेनॉन पत्रकार बनली आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …