पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याच्या हातात विराटचं पोस्टर, शोएब अख्तर म्हणतो…

पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याच्या हातात विराटचं पोस्टर, शोएब अख्तर म्हणतो…

पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याच्या हातात विराटचं पोस्टर, शोएब अख्तर म्हणतो…

Virat Kohli Poster in PSL : विराट कोहली म्हणजे जगातील अव्वल दर्जाच्या फलंदाजांपैकी एक. विराटचे चाहते जगभरात आहेत. प्रत्येक देशात विराटचे चाहते असून पाकिस्तानही याला अपवाद नाही. सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान प्रिमियर लीग अर्थात पीएसएल (PSL) सुरु आहे. याच पीएसएलमधील एका सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका चाहत्याने हातात विराटचं पोस्टर पकडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या चाहत्याचा हातात पोस्टर पकडलेला फोटो पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने पोस्च करत त्याला एक कास कॅप्शनही दिलं आहे.

पाकिस्तानच्या चाहत्याने हातात घेतलेल्या या पोस्टरमध्ये विराट कोहली दिसत असून त्याखाली ‘मला तुझं शतक पाकिस्तानात पाहायचंय’ असं लिहिलं आहे. याचा अर्थ तो चाहता विराटचं शतक तर पाहू इच्छित आहे, पण सोबतच भारताने पाकिस्तानचा दौरा करावा अशी सूचक इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. दरम्यान या फोटोला शोएब अख्तरने त्याच्या ट्वीटरवर शेअर केला असून त्याला कॅप्शनही दिलं आहे.शोएबने लिहिलं आहे, कोणतरी ”गदाफी स्टेडीयममध्ये प्रेमभावना पसरवत आहे.” संबधित सामना हा पाकिस्तानच्या गदाफी मैदानात खेळवला जात असल्याने अख्तरने असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा :  शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर रंगणार दुसरा एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?

विराटच्या शतकाकडे सर्वांचे लक्ष 

विराटने नुकतंच संघाचं कर्णधारपद सोडलं असून तो त्याची शंभरावी कसोटी आता श्रीलंका संघाविरुद्ध खेळणार आहे. 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत विराटकडे अनेकांचे लक्ष असेल. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याची ही पहिलीच कसोटी असणार आहे. दरम्यान त्याच्या शतकाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. विराटने नोव्हेंबर, 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध शेवटचं शतक झळकावलं होतं.  

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …