एकेकाळी प्लेस्कूलमध्ये मुलांना सांभाळायची, आज आहे बॉलिवूडची मोठी स्टार, ओळखलात का या चिमुकलीला?

Stars Childhood Picture : चित्रपटांमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांच्या अप्रतिम मेकओव्हरसाठी चर्चेत आले आहेत. अशा वेळी त्यांच्या बालपणीची फोटो (Stars Childhood Picture) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. साहजिकच, या फोटोत त्यांना ओळखणे कठीण होऊन बसते. आता अशाच एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोमध्ये एक लहान मुलगी दिसत आहे. हिरव्या रंगाच्या फ्रॉकमध्ये बसलेली ही मुलगी रागात दिसत आहे. आज ही मुलगी बॉलिवूडची मोठी अभिनेत्री बनली आहे. आतापर्यंत तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की ही लहान चिमुकली कोण आहे. तर तुमची उत्सुकता अधिक ताणून न ठेवता ही लहान मुलगी दुसरी कोणी नसून कियारा अडवाणी (Kiara Advani) आहे. कियाराचं आज बॉलीवूडमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून कियाराला प्रचंड यश मिळालं. मात्र, चित्रपटात दिसण्याचा तिचा कोणताही विचार नव्हता. रिपोर्ट्सनुसार,कियाराने हौस म्हणून या क्षेत्रात पाऊल ठेवले. एका मुलाखतीत कियाराने सांगितले होते की, अभिनेत्री होण्यापूर्वी ती प्री-स्कूलमध्ये तिच्या आईबरोबर काम करायची.

हेही वाचा :  'पठाण'च्या कमाईवर शाहरुख खान चाहत्याला म्हणाला, भावा फोनचे नंबर...

 


शाळेतील इतर शिक्षकांप्रमाणे, कियारा लहान मुलांबरोबर खेळायची. त्यांना कविता लिहायला शिकवायची. रिपोर्ट्सनुसार, कियाराला मुलांवर खूप प्रेम आहे. इतकेच नाही तर एकदा तिने आपल्या ड्रीम मॅनबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. सध्या कियारा सिद्धार्थ मल्होत्राला डेट करतेय अशा चर्चा आहेत. परंतु, हे कितपत खरं आहे हे येत्या काही काळातच कळेल. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …