एका प्रसिद्ध चॅनलने घेतलेल्या मुलाखतीत, दीपिका म्हणाली की, 2015 या वर्षी मी एका गंभीर आजाराशी झूंज देत होते. या आजाराबाबत मला काडीमात्र कल्पना नव्हती. जर माझ्या आईने लक्षणे ओळखली नसती, तर मला या आजाराबाबत कळालंच नसत, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. दीपिका पदुकोण ज्या आजाराबाबत बोलत होती. तो आजार मानसिक आजार होता. 2015 साली ती या डिप्रेशनचा सामना करत होती. या आजाराबाबत मुलाखतीत बोलताना दीपिका पुढे म्हणाली की, “माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात आणि प्रत्येक वेळी ते मला भेटायला यायचे, तेव्हा मी नेहमीच खंबीर राहायचे, जसे सर्व काही ठीक आहे. पण एकदा ते बंगळुरूला परत जात असताना मी पुर्णत खचलेले. यानंतर आईने मला काही प्रश्न विचारले, यावेळी मला एकटेपणा जाणवत होता. त्यावेळी असे वाटले की देवाने त्यांना माझ्यासाठीच पाठवले आहे.
हेही वाचा – Urvashi Rautela : उर्वशीचं नक्की चाललंय काय?; ऋषभ पंतच्या मागे थेट पोहोचली ऑस्ट्रेलियात!
मुलाखतीत दीपिका पुढे म्हणाली की, जर तिच्या आईने तिची लक्षणे ओळखली नसती तर आज ती कोणत्या अवस्थेत असते हे तिला माहित नसते. तसेच मी या आजाराशी झूंज देत असताना माझ्या आईची भूमिका खूप महत्त्वाची होती, असे तिने सांगितले आहे.
दरम्यान उद्या 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त आयोजित तिरुवल्लूर, तामिळनाडू येथून तिच्या मानसिक आरोग्य फाउंडेशनच्या ‘लिव्ह लव्ह लाफ’ या कार्यक्रमामध्ये दीपिकाने मानसिक आरोग्याविषयी आणि त्याला कसे सामोरे जावे आणि त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगितले. ती पुढे म्हणते, ‘जेव्हा मी इतरांच्या कथा ऐकते तेव्हा मला कळते की काळजी घेणाऱ्याचे मानसिक आरोग्य हे आजारी व्यक्तीच्या मानसिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असते. दीपिकाचे फाउंडेशन ‘लिव्ह लव्ह लाफ’ चे उद्दिष्ट मानसिक आजाराशी झुंजणाऱ्या लोकांना मदत करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या