सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपल्या हातांच्या ताकदीने सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. या मुलाची ताकद पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये हा मुलगा आपल्या हातांनी एक जड ट्रॅक्टर उचलताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे या ट्रॅक्टरमध्ये इतर काही मुलेही बसलेली आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ बघून नेटकरी या मुलाला ‘बाहुबली’ अशी उपाधी देत आहेत. तसेच, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअरही केला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा हा मुलगा त्याच्या कारनाम्यामुळे चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा समोरून ट्रॅक्टर उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक कारणे
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की या ट्रॅक्टरमध्ये इतरही मुले बसलेली आहेत. यामुळे ट्रॅक्टर उचलणे इतकेही सोपे नव्हते. परंतु हा मुलगा ट्रॅक्टरच्या समोर येतो आणि ट्रॅक्टर उचलतो. या मुलाची ही कृती पाहून नेटकरी हैराण आहेत. प्रत्येकजण या मुलाचे कौतुक करताना दिसत आहे. तथापि, काहीजण हा व्हिडीओ बनावट असल्याचे सांगत आहेत.
याशिवाय, ट्रॅक्टरच्या मागील बाजूस भार असल्याने ते उचलणे सोपे असल्याचेही काहीजण म्हणत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत ६५ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. तर, ४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. बहुतेक युजर्स या व्हिडिओवर आश्चर्यकारक इमोजी कमेंट करत आहेत.
The post अबब! या लहानग्याने आपल्या हातांनी उचलला ट्रॅक्टर; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क appeared first on Loksatta.