Breaking News

अ‍ॅरॉन फिंचनंतर कोण होणार ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन? ‘त्या’ दोघांपैकी एकाला संधी?

केर्न्स, ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अ‍ॅरॉन फिंचनं वन डे क्रिकेटला अलविदा केला. न्यूझीलंडविरुद्ध आज केर्न्समध्ये खेळवण्यात आलेला सामना फिंचच्या कारकीर्दीतला अखेरचा सामना ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला हरवून कर्णधाराला विजयी निरोप दिला. त्याचबरोबर तीन वन डे सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकून कांगारुंनी किवी संघाला व्हाईटवॉशही दिला. पण आता क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर प्रश्न आहे तो फिंचनंतर संघाचं नेतृत्व कोण करणार?

स्मिथ-वॉर्नरचा विचार होणार?

ऑस्ट्रेलियानं कसोटी संघाचं कर्णधारपद पॅट कमिन्सकडे आहे. तर वन डे आणि टी20त अ‍ॅरॉन फिंच संघाची कमान सांभाळत होता. फिंच यापुढे केवळ टी20 क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आता वन डेसाठी नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. सध्याचा संघ पाहता अनुभवी स्टीव्ह स्मिथ किंवा डेव्हिड वॉर्नर यांच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

2018 साली केपटाऊन कसोटीतील बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. वर्षभरानंतर दोघंही मैदानात परतले. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नियमितपणे नेतृत्व मात्र या दोघांच्या हाती सोपवलं नाही. कमिन्सच्या अनुपस्थितीत एका कसोटीत स्मिथ कॅप्टन बनला पण त्यानंतर पुन्हा तो केवळ फलंदाज म्हणूनच संघात आहे. पण फिंचनंतर स्मिथकडे कर्णधारपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

स्मिथचं शतक

दरम्यान फिंचच्या अखेरच्या वन डेत स्टीव्ह स्मिथनं खणखणीत शतक ठोकलं. त्यानं 105 धावांची खेळी केली. विराट कोहलीप्रमाणेच स्मिथनं तब्बल दोन वर्षानंतर वन डेत शतकी खेळी केली. स्मिथच्या याच खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 25 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता फिंचनंतर  स्मिथकडेच पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्रं येणार का? हे पाहावं लागेल.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous ईडीने जप्त केलेली करोडोंची रक्कम कुठे ठेवली जाते? वाचा
Next Sri Lanka vs Pakistan- ‘हा’ संघ जिंकणार आशिया कप, आकाश चोप्रा यांनी सांगितला आशिया कप २०२२ चा चॅम्पियन

Check Also

आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते श्रीलंकेने फक्त या सामन्यात करून दाखवलं, सर्वांना दिला मोठा धक्का

Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: Sep 12, 2022, 12:53 AM asia …

श्रीलंकेला मिळाली नवी उमेद, पाकिस्तानला हरवून सहाव्यांदा पटकावला आशिया कप

दुबई, 11 सप्टेंबर: गेले काही महिने देशातल्या राजकीय अस्थिरतेमुळे डळमळीत झालेल्या श्रीलंकेला नवी उमेद मिळाली …