Aadhaar Update Tips : घरबसल्या दुरुस्त करा आधार कार्डवरील चुका

Aadhar Details Correction : सध्या प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) बंधनकारक झालंय. जवळपास प्रत्येक कामासाठी, सरकारी योजनांसाठी (Government Scheme) आधार अत्यावश्यक झालंय. व्यक्तीची ओळख ही आधारद्वारे होतेय. बँक खातं, सिम कार्ड, कोणत्याही सर्टिफिकेटसाठी आधार लागतोच. मात्र अनेकदा आधार कार्डातील नाव, पत्ता, जन्मतारीख यासारख्या तपशीलात चूक होते. ज्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र या लहान चुका तुम्ही घरबसल्या दुरुस्त करता येतात. यामुळे बहुमूल्य वेळही वाचतो. तसेच स्वत: कार्डधारकच दुरुस्ती करत असतो, त्यामुळे पुन्हा चूक होण्याची शक्यता नसतेच. (know how to aadhar card name birth date address email details Correction) 

आधार कार्डमधील चुका दुरुस्त कशा करायच्या, याबाबत अनेकांना माहिती नसते. या दुरुस्ती कशा करायच्या हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेूऊयात. आधारकडून चुका दुरुस्त करण्याची संधी दिली जाते. तसेच या दुरुस्तीसाठी फक्त 50 रुपये शुल्क आकारलं जातं.  तर बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये आकारले जातात. या व्यतिरिक्त जास्त पैसे आकारल्यास (https://resident.uidai.gov.in/file-complaint) या लिंकवर जाऊन तक्रार करु शकता.  

यात एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे बायोमेट्रिक अपडेटसाठी आधार केंद्रावरच जावं लागेल. तर इतर दुरुस्ती या ऑनलाईन करता येतात. आता आपण आधारवरील पत्ता बदलायचा किंवा दुरुस्त कसा करायचा हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.

हेही वाचा :  अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्ठा, पुण्यात 3 जणांना अटक

– आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा. तिथे Proceed To Updeate Address या पर्यायवर क्लिक करा. 

– आधार क्रमांक, रजिस्टर्ड मोबाईल टाकल्यानंतर ओटीपी मिळेल. ओटीपी एंटर करा. त्यानंतर लॉगीन करा. 

– ‘अपडेट न्यू एड्रेस प्रूफ’ क्लिक करुन नवीन पत्ता टाका.  

– एड्रेस प्रूफ पर्याय निवडा. तिथे एड्रेस प्रूफ सबमिट करा. 

– तुम्ही टाकलेली विनंती अर्थात आधार अपडेट रिकवेस्ट रिसीव्ह होईल. तसेच तुम्हा 14 अंकी अपडेट रिकवेस्ट मिळेल.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …