Aadhaar Card: तुमच्याकडे आधार कार्ड आहे? तर मिळणार ही नवी सुविधा, UIDAI ने दिली माहिती

Aadhaar Card Latest News: आधार कार्डसंदर्भात मोठी अपडेट माहिती समोर आली आहे. UIDAI कडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आधार कार्ड (Aadhaar Card) इतके महत्वाचे झाले आहे की, आधार कार्डाशिवाय तुम्ही तुमचे कोणतेही काम करु शकत नाही. सरकारी काम असो वा निमसरकारी काम, आधार क्रमांक सर्वांसाठी आवश्यक आहे. (Aadhaar Card Marathi News) अशा परिस्थितीत, आधार अपडेट करणे आवश्यक आहे, परंतु बऱ्याच वेळा यूजर्सला आधारशी संबंधित समस्या येतात. मात्र, या समस्या सोडविण्यासाठी आता तुम्ही सहजपणे तक्रार नोंदवू शकता.  (Aadhaar Card Latest Marathi News)

UIDAI ची ट्विटद्वारे माहिती

UIDAI च्या वतीने ट्विट करुन माहिती देण्यात आली आहे की, आता आधारशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्र, प्रादेशिक कार्यालयाला भेट देऊ शकता. तुम्ही येथे आधारशी संबंधित तक्रार नोंदवू शकता. तुमच्या जवळच्या आधार केंद्र , प्रादेशिक कार्यालयाच्या माहितीसाठी तुम्ही https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या लिंकला भेट देऊ शकता  .

हेही वाचा :  देवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; 'त्या' दाराआड दडलंय मोठं गुपित

लॉन्च केले आधार तक्रार पोर्टल

 आधार कार्ड  यूजर्सच्या सुविधा लक्षात घेऊन UIDAI ने तक्रार पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये तुम्हाला दोन भाषांचा सपोर्ट मिळतो. यासोबतच तुम्हाला तुमचा फीडबॅक शेअर करण्याचा पर्यायही आहे. 

तुम्ही या टोल फ्री नंबरवर कॉल करु शकता,

यासोबतच UIDAI ने एक टोल फ्री नंबर देखील जारी केला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्ही आधारशी संबंधित तक्रार करु शकता. यासाठी तुम्हाला 1947 वर कॉल करावा लागेल. या नंबरद्वारे तुम्ही पीव्हीसी आधार कार्डची स्थिती, तक्रारीची स्थिती आणि आधार केंद्राविषयी माहिती देखील मिळवू शकता.

तुम्ही मेलवरही संपर्क करु शकता, याशिवाय तुम्ही [email protected] या ईमेल आयडीवरही संपर्क करू शकता . तुम्ही मेलद्वारे तक्रार नोंदवू शकता. तशी सुविधा  UIDAI सुरु केली आहे. त्यामुळे यापुढे ज्या काही समस्या असतील त्या सुटण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :  Odisha Train Accident: ....अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना अश्रू अनावर; म्हणाले "आमची जबाबदारी अद्यापही...."

 नाव किती वेळा बदलता येतं? (Name Update in Aadhar Card)

आधार कार्डवरील (Aadhaar Card News) नाव किती वेळा बदलता येतं असा प्रश्न अनेकांना असतो. तर आधार कार्डमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असेल किंवा महिलांना लग्नानंतर आडनाव बदलायचं असेल तर त्या करू शकतात. UIDAI ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये नाव बदलण्याची परवानगी देते. पण, आधार कार्डमधील नाव अपडेट फक्त दोनदाच करता येईल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …