Jammu Kashmir : सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये सुरक्षदालाच्या हाती मोठं यश लागलं आहे. सुरक्षादलाने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, एवढंच नाही तर, याठिकाणी अद्याप चकमक सुरू आहे. पुलवामा, हंदवाडा आणि गांदरबलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पुलवामाच्या चेवाकलां भागात चकमक सुरू झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 

पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने परिसराला घेरलं आहे. सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर शोध मोहीम सुरू आहे. ज्या ठिकाणी दहशतवादी लपले होते त्या ठिकाणी सुरक्षा दल पोहोचताच चकमक सुरू झाली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी कुलगाममधील सरपंचांची गोळ्या झाडून हत्या केली. या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. दहशतवाद्यांनी स्थानिक  प्रतिनिधींची हत्या केली आहे. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘ कुलगाम जिल्ह्यातील अडुरा भागात रात्री 8.50 वाजता दहशतवाद्यांनी शब्बीर अहमद मीर यांना दक्षिण काश्मीरमधील त्यांच्या घराजवळ गोळ्या घातल्या.’

जेव्हा शब्बीर अहमद मीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शब्बीर अहमद मीर सरपंच होते. अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

हेही वाचा :  संजय राऊत ज्यामुळे जेलबाहेर बाहेर आले तो 'जामीन' म्हणजे नेमकं काय?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …