गोदावरी गौरव म्हणजे सर्व कलांचा सन्मान! | Godavari Gaurav is the honor of all arts akp 94


गोदावरी गौरव सन्मान म्हणजे सर्व कलांचा सन्मान आहे. या माध्यमातून कलेचे नवीन रूप समोर येत आहे.

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे उद्गार

नाशिक : गोदावरी गौरव सन्मान म्हणजे सर्व कलांचा सन्मान आहे. या माध्यमातून कलेचे नवीन रूप समोर येत आहे. सर्वानी कलेच्या वेगवेगळया प्रांतांचा आनंद घ्यावा, हा संदेश गोदागौरव पुरस्काराने दिला आहे, असे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी येथील रावसाहेब थोरात सभागृहात गोदावरी गौरव पुरस्कारांचे वितरण न्या. चपळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.   लहानपणी आपल्या वेगवेगळया इच्छा असतात. तसेच प्रत्येकाचे जीवन वेगवेगळया कलेत चितारलेले आहे. गोदावरी गौरव या साऱ्या कलांचे प्रतिबिंब आहे, असे न्या. चपळगावकर यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात नाटय़कर्मी अतुल पेठे, अमेरिकेतील विद्यापीठात संशोधन करणारे डॉ. हेमचंद्र प्रधान, देश-विदेशात कलावंत घडविणारे पंडित सुरेश तळवलकर, डॉ. सुधीर पटवर्धन, करोनाच्या संकटाला  सामोरे जाणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे, बिबटयाशी झुंज देऊन मुलाचे प्राण वाचविणाऱ्या सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

हेही वाचा :  PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी सरकारने आणलं नवं मोबाईल App, 'असा' घेता येणार योजनेचा लाभ

यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी करोना काळात कामाचा आलेला ताण, अडचणी याविषयी माहिती दिली. केंद्र सरकारशी समन्वय साधत काम केल्याने राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू प्राणवायूअभावी झाला नाही. आव्हान हे संधी म्हणून स्वीकारल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या पुरस्काराचे खरे मानकरी करोना योध्दे आहेत, असे नमूद करीत टोपे यांनी पुरस्काराची रक्कम प्रतिष्ठानला परत केली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …