‘त्या’ तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढले; हत्या की आत्महत्या?


नागपूर : वाडीतील सुराबर्डी परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाबाबत संभ्रम वाढला आहे. तरुणीची हत्या की आत्महत्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निकिता लखन चौधरी (२२, गेडाम लेआऊट, प्रतापनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता ही उच्चशिक्षित असून प्रतापनगरातील फायनान्स कंपनीत नोकरीला होती. ती मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कार्यालयात गेली. दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी ती घराकडे निघाली. परंतु, ती घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तिचा थांगपत्ता न लागल्यामुळे कुटुंबीयांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. वाडी येथील सुराबर्डी परिसरात बकऱ्या चारणाऱ्या मुलांना तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. मुलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. वाडी पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. पोलिसांनी मृतदेहाशेजारी सापडलेल्या बॅगमधील ओळखपत्रावरून तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

दोन मित्रांची चौकशी

निकिताचे दोन तरुणांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. दोघांपैकी एका मित्राच्या व्हॉॅट्सअ‍ॅप चॅट पोलिसांच्या हाती लागल्या. त्यावरून ती दोघांच्याही प्रेमात असून त्यांच्यात वाद झाला होता, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये निकिता सुराबर्डीतील जंगलात एकटीच जाताना दिसत आहे.

हेही वाचा :  पार्टीत सुरु होती 'पत्नींची अदलाबदली', पोलिसांनी धाड टाकल्यानंतर खळबळ, प्रत्येक रुममध्ये एकासह...

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate Hike : ग्राहकांना फुटेल घाम! सोन्याचा दर 67 हजारांच्या पुढे, तर चांदी…, पाहा आजचे दर

Gold Silver Price Today News In Marathi : मार्च  महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमती वाढता वाढेच …

Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!

Kolhapur LokSabha Constituency : कोल्हापूर… दक्षिण काशी करवीर निवासिनी महालक्ष्मीची पावन भूमी… स्वराज्याच्या रक्षणासाठी लढलेल्या …