हरभजन सिंगला ‘आप’कडून राज्यसभेची ऑफर ? स्पोर्ट युनिव्हर्सिटीचं प्रमुखपदही मिळण्याची शक्यता


आपचे नेते भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आप अर्थात आम आदमी पार्टीने पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे आता पक्षाकडून राज्यसभेत आपले बळ वाढवण्यावर विचार केला जातोय. आपतर्फे माजी क्रिकेकटपटू हरभजन सिंग यांना थेट राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. हरभजन सिंग यांच्याकडे पंजाबमधील प्रस्तावित स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे प्रमुखपददेखील सोपवले जाण्याची शक्यता […]

आपचे नेते भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आप अर्थात आम आदमी पार्टीने पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे आता पक्षाकडून राज्यसभेत आपले बळ वाढवण्यावर विचार केला जातोय. आपतर्फे माजी क्रिकेकटपटू हरभजन सिंग यांना थेट राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. हरभजन सिंग यांच्याकडे पंजाबमधील प्रस्तावित स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे प्रमुखपददेखील सोपवले जाण्याची शक्यता आहे.

पंजाबची निवडणूक जिंकल्यामुळे आता आपची राज्यसभेतही शक्ती वाढणार आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी कोणाला संधी द्यावी यावर आपमध्ये चर्चा सुरु आहे. त्यासाठी पहिले नाव म्हणून हरभजन सिंग यांना निवडण्यात आल्याची चर्चा आहे. हरभजन सिंग यांना आप पक्षाकडून राज्यसभेसोबतच प्रस्तावित असलेल्या स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे प्रमुख बनवले जाऊ शकते. सध्या आप पक्षाचे राज्यसभेमध्ये नारायणदास गुप्ता, शुशीललकुमार गुप्ता तसेच संजय सिंह असे तीन खासदार आहेत.

हेही वाचा :  Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert

निवडणूक जिंकल्यानंतर हरभजन सिंग यांनी भगवंत मान यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. या ट्विटमध्ये हरभजन यांनी भगवंत मान यांना आपला मित्र म्हटलं होतं. हरभजन सिंग प्रसिद्ध चेहरा असल्यामुळे त्याचा फायदा आपला होणार आहे. आपल्या करिअरमध्ये हरभजन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० बळी घेतलेले आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …