india sri lanka test akshar patel get a chance or siraj be included in the playing eleven zws 70 | भारत-श्रीलंका कसोटी मालिका : अक्षर, सिराजपैकी एकाला संघात स्थान?


चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांनासुद्धा तितकीच मदत मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध शनिवारपासून बंगळूरु येथे खेळवण्यात येणाऱ्या प्रकाशझोतातील दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात किमान एक बदल अपेक्षित आहेत. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात संघातील स्थानासाठी चुरस असून ऑफ स्पिनर जयंत यादवला वगळण्यात येण्याची शक्यता आहे.

मोहालीच्या फिरकीला पोषक खेळपट्टीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात जयंतने १७ षटके गोलंदाजी करताना एकही बळी मिळवला नाही. तर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या जोडीने श्रीलंकेच्या २० पैकी १५ फलंदाजांना बाद केले.

त्यातच आता अक्षर पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. इंग्लंडविरुद्ध गतवर्षी झालेल्या प्रकाशझोतातील कसोटीत त्याने ११ बळी मिळवले होते. फलंदाजीतही तो जयंतच्या तुलनेत उजवा असल्याने अक्षरकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे.

मात्र श्रीलंकेच्या आघाडीच्या सहापैकी चार फलंदाज डावखुरे असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन दोन डावखुऱ्या फिरकीपटूंना खेळवण्याची जोखीम पत्करणार की सिराजला संघात स्थान देऊन वेगवान गोलंदाजी बळकट करणार, हे पाहणे रंजक ठरेल. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांनासुद्धा तितकीच मदत मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजीत मात्र पहिल्या कसोटीतील क्रमच कायम ठेवण्यात येईल, असे दिसते.

हेही वाचा :  धावत्या बाईकवर दोन तरुणींचे अश्लील चाळे, liplock करतानाचा Video Viral



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …