जे उमेदवार NIFT Entrance Test 2022 या परीक्षेत पात्र ठरतील, ते पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. शॉर्टलिस्टेड उमेदवार NIFT सिच्युएशन टेस्ट देण्यासाठी पात्र ठरतील.
पुढील पद्धतीने पाहा NIFT 2022 Result –
– अधिकृत संकेतस्थळ nift.ac.in वर जा.
– या पेजवर वरील बाजूस अॅडमिशन हा पर्याय निवडा.
– तेथे तुम्हाला Results ची लिंक दिसेल.
– आता तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणी क्रमांक आदी माहिती भरा.
– निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल. तो डाऊनलोड करा आणि त्याचे एक प्रिंट घ्या.
शॉर्टलिस्टेड उमेदवारांनी त्यांचे पसंतीचे ठिकाण सिच्युएशन टेस्टसाठी कळवावे लागेल. याची अंतिम मुदत ११ मार्च २०२२ आहे. त्यानंतर पोर्टल बंद होईल. ही चाचणी २ एप्रिल २०२२ ते ५ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे.
सिच्युएशन टेस्ट नंतर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या फेऱ्या होतील. या फेऱ्या ७ एप्रिल २०२२ ते २६ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहेत. या सर्व फेऱ्या लोधी रोड, नवी दिल्ली येथील इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये होतील.
हेही वाचा: