‘बडे पापा’ म्हणत बेडवर नेलं, नंतर कॅमेऱ्यात केलं रेकॉर्ड; अश्लिल साईटवर VIDEO पाहून 72 वर्षीय वृद्धाला बसला धक्का

Crime News : आसाममधल्या (Assam) एका घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील एका 72 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या वृद्धाच्या आत्महत्येचे कारण समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. पॉर्न साईटवर स्वतःचा व्हिडीओ पाहून या वृद्धाने टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली आहे. त्या व्हिडिओमध्ये ही वृद्ध व्यक्ती एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत शारिरीक संबंध करत असताना दाखवण्यात आले होते. हनी ट्रॅपमध्ये (honeytrap) अडकल्यानंतर विवाहित वृद्धाने स्वतःला संपवलं.  या आत्महत्येनंतर गावातील महिलांनी आरोपी तरुणीच्या अटकेसाठी आंदोलन केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

तरुणीने घरी बोलवलं अन्…

वृद्धासोबतचे लैंगिक संबंध महाविद्यालयीन तरुणीसोबतचे गुप्तपणे तिच्या मोबाइल फोनवर रेकॉर्ड केले होते. त्यानंतर तरुणीने तो व्हिडीओ अश्लिल साईटवर अपलोड केला होता. हा व्हिडीओ पाहताच वृद्धाला जबरदस्त धक्का बसला. बदनामीच्या भीतीने वृद्धाने आपलं जीवन संपवलं आहे. जोरहाट जिल्ह्यातील ढेकलिया गावात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी तरुणीने वृद्धाला ‘बडे पापा’ या नावाने हाक मारायची. तरुणी एकटी असताना तिने 72 वर्षीय व्यक्तीला घरी बोलावले होते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या बोलण्यावरून वृद्ध व्यक्ती तिच्या घरी गेली होती. यानंतर तरुणीने वृध्दाला तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी तयार केले. यानंतर हा सर्व प्रकार तिने मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला.

हेही वाचा :  फ्रिज, दगड कापण्याच्या मशीन अन् सुटकेस... लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने गर्लफ्रेंडचे केले तुकडे

लैंगिक संबंधाआधी दिल्या गोळ्या

हे सर्व कृत्य करण्याआधी तरुणीने वृद्धाला औषध म्हणून नशेच्या गोळ्या खाण्यासाठी दिल्या होता. त्यामुळे नेमकं काय घडलं हे वृद्धालाही समजलं नाही. आत्महत्येपूर्वी त्या व्यक्तीने घडलेला प्रसंग गावकऱ्यांना सांगितला होता. तरुणी मला ब्लॅकमेल करत होती, असे गावकऱ्यांनी सांगितले. शेवटी तरुणीने लैंगिक संबंधांचा व्हिडीओ अश्लिल साईटवर अपलोड केला. अश्लिल साईटवर व्हिडीओ पाहून वृद्धाला धक्का बसला आणि त्याने आत्महत्या केली. तपासानंतर पोलिसांना वृद्धाच्या मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ मिळाला आहे.

दुसरीकडे हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला होता ज्यामुळे वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना खूप शरम वाटत होती. अपमान सहन न झाल्याने वृद्धाने स्वतःचे जीवन संपवण्याच्या निर्णय घेतला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपी तरुणीला कठोर शिक्षा करण्याची मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे. मुलीने यापूर्वी अनेक पुरुषांना फसवून त्यांचे खासगी व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड केल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ देखील संतप्त झाले आहेत. पोलीस तपासात तरुणीचे अन्य काही लोकांसोबतचे अश्लिल व्हिडिओ समोर आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या या तरुणीने तिच्या एका वर्गमित्रसोबत अश्लील व्हिडिओही बनवला होता. यावर मुलीने विद्यार्थिनीवर तिचा व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला होता. मात्र, विद्यार्थ्याने मुलीनेच आपल्याला फसवले असे सांगितले होते.

हेही वाचा :  ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …