शेन वॉर्न निधनानंतर लेकीची भावूक पोस्ट, पूर्वाश्रमीच्या पत्नीची ‘ती’ कमेंट चर्चेत

त्यात तिने वडिलांसोबतचे काही जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे ४ मार्चला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर क्रिकेटविश्वात संपूर्ण जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. जगातील महान फिरकी गोलंदाज अशी त्याची ख्याती होती. शेन वॉर्नच्या निधनानंतर त्याची मुलगी समर हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने वडिलांसोबतचे काही जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

समरने इन्स्टाग्रामवर शेन वॉर्नसोबतचे १० फोटो पोस्ट केले आहे. यात तिच्या लहानपणीचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना ती फार भावूक झाली. यावेळी ती म्हणाली, “माझ्याकडे आता बोलण्यासाठी शब्द नाही. मला असं वाटतंय की मी स्वप्न पाहत आहे. आता कोणीतरी मला उठवेल आणि सांगेल की तू ठीक आहे. पण आता वास्तविक जीवनात हे होऊ शकत नाही. यापुढे कधीही मला तुझा गोड आवाज ऐकू येणार नाही. सर्व काही ठीक होईल, तुला माझा वाटणार अभिमान, तुझे ‘गुड नाईट’ किंवा ‘गुड मॉर्निंग’ या सर्वांची मला फार आठवण येतं आहे.”

हेही वाचा :  “माफ करा मला…”, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट

“बाबा, मला आतापासूनच तुझी खूप आठवण येत आहे. जर मला माहिती असते की, तुझे हे क्षण माझ्यासोबतचे हे शेवटचे आहेत आणि तुझा शेवटचा श्वास थोड्याच अंतरावर आहे, तर मी तुम्हाला घट्ट मिठी मारली असती. मला तुझ्यासोबत अजून सुट्ट्या घालवायच्या होत्या, तुझ्यासोबत हसायचे होते, तुला प्रेमाने गुड नाईट म्हणायचे होते आणि सकाळी पुन्हा भेटू म्हणायचे होते, अजून गप्पा मारायच्या होत्या. आमचा दिवस कसा गेला, हे जेव्हा तू विचारायचा आणि त्यानंतर जेव्हा तू मिठी मारायचा तेव्हा मला फार सुरक्षित वाटायचे.”

“बाबा, माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तू कुठेही असलास तरी एक वडील म्हणून तू सदैव आमच्या पाठिशी असशील. तुझ्या लहान मुलीवर असेच प्रेम राहू दे. मला तुझा नेहमीच अभिमान वाटत राहील”, असे समरने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

झुंड’वरुन होणाऱ्या टीकांवर नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले “जर तक्रार असेल तर…”

दरम्यान समरच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. ब्रिटिश अभिनेत्री एलिझाबेथ लिझ हर्लेने यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “समर, मला तर तू खूप आवडतेच, पण तुझे वडील तुझे निस्सीम चाहते होते.” असे एलिझाबेथ लिझ हर्ले म्हणाली. ब्रिटिश अभिनेत्री एलिझाबेथ लिझ हर्लेला आणि शेन वॉर्न एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना त्यावेळी फार उधाण आले होते. २०११ मध्ये पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्या दोघांनी लग्न केले. पण त्यानंतर अवघ्या तीन वर्षात त्यांचे नाते संपुष्टात आले.

शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्ध सिडनी येथे कसोटी पदार्पण केले होते. पहिल्या कसोटीत तो फार काही करू शकला नाही आणि फक्त एक विकेट घेऊ शकला. १९९३ च्या ऍशेस मालिकेपूर्वी, वॉर्न ११ कसोटीत ३२ बळी घेत सरासरी लेग-स्पिनर मानला जात होता. वॉर्नने १९९२च्या बॉक्सिंग-डे कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध ७/५२ अशी कामगिरी केली होती.

हेही वाचा :  Gangubai Kathiawadi : अभिनेता विजय राजची व्यक्तिरेखा वादाच्या भोवऱ्यात, वाचा नेमकं काय घडलंय

दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

वॉर्नचा खरा खेळ १९९३ च्या ऍशेस मालिकेत समोर आला. त्याने पहिल्या अॅशेस मालिकेत पाच कसोटी सामन्यात २९ विकेट्स घेतल्या. १९९३ च्या ऍशेस कसोटीच्या पहिल्या षटकात, वॉर्नने खेळपट्टीचा फायदा घेतला आणि माईक गॅटिंगच्या लेग-स्टंपच्या बाहेर खेळपट्टीवर खेळलेला एक सुरेख लेग स्पिन टाकला, पण तो ऑफ-स्टंपवर आदळला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Kejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, ‘मिस्टर राजू तुम्ही…’

Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind …

VIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- ‘डॉक्टर से कम समझे क्या!’

Viral Video : देशातील कुठल्याही मंदिरात जा तिथे तुम्हाला आजी आजोबासह अनेक चिमुकले पोरं चंदन …