युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाला जाहीर आव्हान, सोशल मीडियावर शेअर केलं लोकेशन; म्हणाले “मी कोणाला…”


देशभक्तीपर युद्ध जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा निर्धार

रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केलं असून त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. यादरम्यान रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट आखला जात असल्याचाही दावा आहे. इतकंच नाही तर जर रशियाने केलेल्या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष मारले गेले तर पुढील योजना काय असेल याची आखणी युक्रेनकडून करण्यात आली आहे. युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की यांना ठार करण्यासाठी रशियामधील अनेकजण कीव्ह शहरात उपस्थित आहेत. त्यांना झेलेन्स्की यांची हत्या करण्याचा आदेश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यादरम्यान झेलेन्स्की यांनी मात्र थेट आव्हानच दिलं आहे.

झेलेन्स्की यांनी इन्स्टाग्रामला आपलं लोकेशन शेअर केलं आहे. यावेळी त्यांनी आपलं लपलेलो नसून, कोणालाही घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. “मी कीव्ह आणि बोकोवा स्ट्रीटवर राहतो. मी लपलेलो नाही. मी कोणालाही घाबरत नाही,” असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी आमचे हे देशभक्तीपर युद्ध जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी असल्याचंही म्हटलं आहे.

“जर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींची हत्या झाली तर…,” अमेरिकेने सांगितला प्लान

मिळालेल्या माहितीनुसार, पुतीन यांनी २४ फेब्रुवारीला आक्रमण केल्यापासून तीन वेळा रशियाच्या मारेकऱ्यांनी झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. आपल्या डेस्कवर बसलेल्या झेलेन्स्की यांनी व्हिडीओत सांगितलं आहे की, “आज आमच्या संघर्षाची १२ वी संध्याकाळ आहे. आम्ही सर्व मैदानात आहोत. आम्ही सर्वजण काम करत आहोत. मी कीव्हमध्ये असून माझी टीमही सोबत आहे”.

हेही वाचा :  Russia-Ukraine War : बाबा वेंगांची रशियाविषयीची भविष्यवाणी चर्चेत; त्या म्हणाल्या होत्या, “रशियाच जगावर…!”

युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या १७ लाखांहून अधिक

युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या १७ लाखांहून अधिक झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक संस्थेने म्हटले आहे.२४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इतर देशांमध्ये आश्रय घेतलेल्या लोकांची संख्या सुमारे १७ लाख ३५ हजार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्चायुक्तांनी (यूएनएचसीआर) सोमवारी सांगितले. रविवारी हीच संख्या १५ लाख ३० हजार होती.

मदतीबद्दल युक्रेनकडून भारताचे आभार ; झेलेन्स्की-मोदी यांचा दूरध्वनीवर संवाद

बाहेर पडलेल्या लोकांपैकी जवळपास तीन पंचमांश, म्हणजे सुमारे १० लाख ३० हजार लोक पोलंडमध्ये, १ लाख ८० हजार लोक हंगेरीमध्ये, तर १ लाख २८ हजार लोक स्लोव्हाकियात गेले आहेत.

दरम्यान, युक्रेनसह शेजारच्या पोलंड व रुमानियामधून येणाऱ्या निर्वासितांचे स्वागत करण्यासाठी युरोपीय महासंघाच्या सर्व २७ सदस्य राष्ट्रांनी ‘सर्व संसाधानांचा’ वापर करावा, असे आवाहन महासंघाचे परराष्ट्र व्यवहार धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी फ्रान्समधील मोंटपेलियरमध्ये केले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …