“मी स्वत: डोंबिवलीत येऊन…”; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा


“भाजपा सरकार असताना महाराष्ट्राचं पोलीस दल कधीही राजकीय दबावाखाली नव्हते. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील पोलीस दल अत्यंत दबावाखाली आहे. अशा प्रकारचा राजकीय दबाव महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा आहे,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी डोंबिवलीमध्ये बोलताना केली.

“डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर हल्ला होऊन चार दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही ही शोकाची आणि गंभीर बाब आहे. आरोपीला लवकर अटक झाली नाही तर मी स्वतः डोंबिवलीत येऊन मोर्चा काढीन, पोलीस ठाण्याला घेराव घालीन,” असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच, “हा विषय विधानसभेत मांडू,” असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

डोंबिवली येथे चार दिवसांपूर्वी एका भाजपा कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला भेटण्यासाठी फडणवीस डोंबिवलीमध्ये आले होते. हा कार्यकर्ता भाजपाचा समाज माध्यम हाताळत होता. त्याच्यावरील जीवघेणा हल्ला हा राजकीय वादातूनच झाला असल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र या घटनेला चार दिवस उलटून गेले तरी देखील आरोपीला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांवरील अशा प्रकारचा राजकीय दबाव अधोगतीकडे नेणारा आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

हेही वाचा :  अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; एका वर्षासाठी केले तडीपार

यावेळी फडणवीस यांनी मोकाशी पाडा येथील शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा देखील उल्लेख केला. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची देखील माहिती घेऊन हे सगळे विषय विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

The post “मी स्वत: डोंबिवलीत येऊन…”; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

Maharastra Politics : ‘तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी…’, रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार …