शिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का! नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिका स्वीकारली; ठाकरेंना सर्वोच्च दिलासा

Shivsena MLA Disqualification Case: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता प्रकरणात केलेल्या सुनावणीविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची संपूर्ण प्रत सर्वोच्च न्यायालयाने मागवली आहे. 8 एप्रिल रोजी या सुनावणीवर सविस्तर सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये घेतली जाणार आहे. मात्र तोपर्यंत नार्वेकरांनी दिलेले सर्व निकाल स्थगित करण्यात आले आहेत. हा निकाल शिंदे गटासाठी मोठा धक्का तर उद्धव ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

कोर्टात काय युक्तीवाद झाला?

उद्धव ठाकरे गटाने नार्वेकरांच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या सरकारला कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे यावर लवकर सुनावणी झाली पाहिजे अशी मागणी केली. उद्धव ठाकरेंकडे पक्ष होता हे स्पष्ट आहे, असं सिब्बल म्हणाल्यानंतर शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंनी, ‘ठाकरे गटानं खोटे कागदपत्रे सादर केले’ असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. “विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निर्णयांमध्ये 2018 ची घटना अमान्य केली आहे,” असं सिब्बल म्हणाले. तसेच, या प्रकरणी हायकोर्टात पाठवण्याची गरज नाही. मायावती प्रकरणातही असंच घडलं होतं. यावर सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यावा,” अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली.

हेही वाचा :  Viral Video समुद्रात उसळल्या मासळीच्या लाटा; किनारपट्टीवर हजारो मृत माशांचा खच

उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते

हरीश साळवे यांनी, “उद्धव ठाकरेंची नेमणूक करण्यासाठीचा प्रस्ताव कोणी मांडला हे बघा. त्यापैकी अनेकांचे म्हणणे आहे की ते स्वतः कधी हजर नव्हतेच. कायद्याचा प्रश्न नंतर आहे,” असं म्हणाले. “आधी राठोड, सावंत यांनी काय साक्ष दिल्या त्या पहा,” असं म्हणत साळवेंनी आमदारांचे ठराव दाखवले. “यामध्ये ठाकरेंचा प्रस्ताव कोणी सादर केला त्यापैकी अनेकजण बैठकीला हजर नव्हते. उद्धव ठाकरेंच्या सोबत किती आमदार होते, याबाबत सादर करण्यात आलेली कागदपत्रे विश्वासार्ह नाहीत. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची कागदपत्रे पाहिली तर त्यावर स्वाक्षरी नाहीत. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष आणि कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आहे. असे अनेक मुद्दे आहेत. मुळात वस्तुस्थितीविषयी या प्रकरणात एकवाक्यता नाही तर यावर कायदेशीर युक्तिवाद काय होणार,” असा सवाल साळवेंनी उपस्थित केला. “हरीश साळवे जो युक्तीवाद करीत आहेत त्यावर निर्णय अध्यक्षांनी केलेला नाही,” असं कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलं.

कोर्टाचा सवाल

आमच्या निकालपत्रात जे लिहिलेलं त्याविरोधात निर्णय नाही झालाय का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी हरीश साळवे यांना विचारला. विधानसभा अध्यक्ष यांच्या निकालातील घटनाक्रम बघा. त्यात कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला नाही, असं ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी म्हटलं. “अजून एक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. नुकतेच एका खटल्यात या न्यायालयाने असा निकाल दिला आहे की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणजे अपील सुप्रीम कोर्टात आले पाहिजे असे नाही. जर इथे फ्रॉजरी आणि फ्रॉड झाला असेल तर विधानसभा अध्यक्ष कोणती टेस्ट लावणार,” असं वकील मुकुल रोहतगी म्हणाले.

हेही वाचा :  Maharashtra HSC 12th Board Result 2024: बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडी

कोर्टाने साळवेंना विचारलं

दरम्यान सरन्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरीश साळवेंनी, “ठाकरे यांनी सुरुवातीला ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाल्याचे सांगितले नंतर ते शिवसेना भवनात झाल्याचे सांगितले,” असं म्हटलं. त्यावर सुप्रीम कोर्टाने साळवेंना, “पॅरा 144 पाहा असं म्हटलं. “खरा पक्ष कोणता पक्ष आहे हे विधानसभेतील बहुमतावरून ओळखता येते? हे निकालाच्या विरोधात नाही का?” असा सवाल कोर्टाने शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना विचारला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एकमेकांच्या अंगावर घातल्या कार..तलवारबाजी आणि बरंच काही..भर रस्त्यात गॅंगवॉर

Karnatak Gangwar Video: आधी पांढरी कार मागच्या बाजुने काळ्या कारला ठोकते..त्यानंतर काळ्या कारमधून 3 तरुण …

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …