Gold Rate : वर्षअखेरीस सोन्याचे दर 75 हजारांवर? आज 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायत ‘इतकी’ रक्कम

Gold Silve Price Today in Mahararashtra : गेल्या काही दिवसांपासून आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय चांदीमध्येही घसरण होताना दिसत आहे.  4 मार्च 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट दिसून आली. मात्र आज सोने चांदी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. 

दरम्यान जागतिक बाजारात सोन्याचा भाव कडाडला असून आज (5 मार्च 2024) 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजारांच्या घरात पोहचलीय. तर मुंबईत आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 65,305 रुपये आहे. काल दहा ग्रॅम सोने सुमारे 64,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 22 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 58,740 रुपये आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तथापि, खरेदी करण्यापूर्वी, आपल्याला एकदा दर माहित असणे आवश्यक आहे.

वर्षअखेरी सोन्याचे भाव 75 हजारांवर जाण्याचा अंदाज 

सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये गेल्या दोन वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. चांगला परतावा मिळत असल्याने लोक यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. दोन वर्षात सोन्याने 55 टक्के परतावा दिला आहे. तर S&P 500 ने 11.3% परतावा दिला आहे. दुसरीकडे, सेन्सेक्स जुलै 2018 च्या तुलनेत कमी आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार 2024 च्या अखेरीस सोन्याचा भाव 75 हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा :  मोतिबिंदूची ही लक्षणे खूप आधीच दिसतात, वेळीच संकेत जाणून घेतल्यास सर्जरी टाळाल

महाराष्ट्रातील इतर शहरांमधील सोनं-चांदीचे दर

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 59,088 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,088 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 64,460 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 59,088 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 64,460 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 59,088 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 64,460 रुपये आहे. 

1947 मध्ये सोन्याचा भाव 88.62 रुपये होता

गेल्या 75 वर्षांत सोने व चांदी चांगलेच महाग झालेच. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा 1 तोळा सोन्याची किंमत 88.62 रुपये असायची. आता आणि याच सोन्यासाठी 56 हजार रुपये मोजावे लागत आहे. याचा अर्थ तेव्हापासून सोने 631 पट (63198%) महाग झाले आहे. स्वातंत्र्यानंतर चांदी 644 रुपयांनी महागली आहे. 1947 मध्ये चांदीची किंमत 107 रुपये प्रति किलो असायची. तर तो 72,064 रुपयांनी विकले जात आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …