भारतातील अव्वल कुस्ती पैलवानांमध्ये घमासान, जामनेरमध्ये ‘नमो कुस्ती महाकुंभ’

जामनेर : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक अशा 13 कुस्ती दंगली आणि त्याचबरोबर खानदेश आणि परिसरातील 100 पेक्षा अधिक पैलवानांचे द्वंद्व पाहाण्याचे भाग्य येत्या 11 फेब्रूवारीला जामनेरकरांना (Jamner) लाभणार आहे. निमित्त आहे ‘नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा’ हा मंत्र भारतातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचं. युवापिढीमध्ये वाढत चाललेल्या उत्तेजक द्रव्य सेवनाचं फॅड रोखण्यासाठी आणि तरुणांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवून ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं ‘नमो कुस्ती महाकुंभ’ (Namo Kusti Mahakumbha) या भारतातील सर्वात मोठ्या कुस्ती दंगलचं आयोजन करण्यात आलं आहे. ही कुस्ती दंगल जामनेरच्या गोविंद महाराज क्रीडांगणावर खेळवली जाणार आहे.

या कुस्ती स्पर्धेचं जामनेरमध्ये  भव्य आणि दिव्य आयोजन केलं जाणार आहे. ही एकदिवसीय कुस्ती दंगल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लढतींमुळे कुस्तीप्रेमींच्या स्मरणात राहिल, असे दिमाखदार आयोजन 11 फेब्रूवारीला करणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.. कुस्ती जगतातील रथी-महारथी एकाच वेळी एका मंचावर आणण्याचा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून रचला जाणार आहे. या एकदिवसीय दंगलीमध्ये राज्यातील पैलवानांसह हिंदुस्थानच्या कुस्ती क्षेत्रातील दिग्गजही आपला जोर दाखवण्यासाठी सध्या अखाड्यांमध्ये आपला घाम गाळत आहेत.

हेही वाचा :  Election Commission च्या निकालानंतर CM शिंदेंनी बदलला DP; बंडखरोनंतरचा Cover Photo पुन्हा झळकला

दिग्गज पैलवानांमध्ये घमासान

या दंगलीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, भारत केसरी  बिनिया मिनला आव्हान देणार आहे. तसंच महेंद्र गायकवाड (उप महाराष्ट्र केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी), विजय चौधरी (ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. मुस्तफा खान (शेर ए हिन्द), प्रकाश बनकर (उप महाराष्ट्र केसरी) वि. भूपिंदर सिंह (भारत केसरी), किरण भगत (उप महाराष्ट्र केसरी) वि. गुरुजनट सिंह (पंजाब केसरी),  बालारफिक केसरी (महाराष्ट्र केसरी) वि. मनप्रीत सिंग (पंजाब केसरी), अजय गुज्जर (भारत केसरी) वि. माउली कोकाटे (उप महाराषट्र केसरी), सुमित मलिक (अर्जुन अवॉर्ड, हिंदकेसरी) वि.हॅपी सिंह (पंजाब केसरी), प्रितपाल सिंग वि. शंटी कुमार(दिल्ली केसरी),  समीर शेख (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. कलवा गुज्जर (भारत कुमार), जतींदर सिंह (रुस्तुम ए पंजाब) वि. सत्येन्द्र मलिक (भारत केसरी), कमलजित (रुस्तुम ए हिंद) वि. माउली जमदाडे (भारत केसरी) आणि रेहान खान (मध्य प्रदेश केसरी) वि. कमल कुमार (शेर ए पंजाब) या 13 प्रमुख लढती होणार आहेत. कुस्तीप्रेमींना दिग्गजांच्या कुस्त्या याची देही याची डोळा पाहाता येणार आहे.

 या दिग्गजांबरोबर खान्देश आणि परिसरातील 100 पैलवान सुद्धा या दंगलमध्ये आपल्या कुस्तीचे डावपेच दाखविणार आहेत. या मैदानात निवेदक म्हणून पै. सुरेश जाधव (चिंचोली),  शरद भालेराव (जालना),  युवराज केचे हे उपस्थित कुस्तीप्रेमींना आपल्या मधाळ वाणीतून मंत्रमुग्घ करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेचं आणखी एक आकर्षण म्हणजे प्रसिद्ध हलगीवादक सुनील नागरपोळे हलगीवादन करून कुस्तीप्रेमी आणि कुस्तीपटूंना प्रोत्साहित करण्याचं कर्तव्य बजावणार आहेत.

हेही वाचा :  आप, शिवसंग्राम, ठाकरे गट ते शिंदे गट; दिपाली सय्यद यांच्या करिअरविषयी जाणून घ्या

विजेत्यांवर लाखोंच्या पुरस्कारांचा वर्षाव
11 फेब्रूवारीला जामनेरमध्ये रंगणारी दंगल संस्मरणीय व्हावी म्हणून आमदार गिरीष महाजन यांनी 13 दंगलीतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करणार असल्याची माहिती दिली. याशिवाय विजेत्या खेळाडूला 3 किलो वजनाची चांदीची गदा आणि ‘नमो कुस्ती महाकुंभ’ हा मानाचा पट्टाही बहाल केला जाणार आहे. अव्वल दंगलीतील पराभूत खेळाडूलाही रोख पुरस्कार दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं. दरवर्षी जामनेरमध्ये  आपल्या मातीतील खेळाचे आयोजन करून तरुण पिढीला ‘नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा’ हा  संदेश आम्ही देणार आहोत. त्यामुळे जामनेरकरांनी न भूतो न भविष्यति ठरणार्‍या कुस्तीच्या महाकुंभाचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने यावे असे आवाहनही गिरीष महाजन यांनी केलं आहे



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दहावी नापास झाल्यावर काय करावे?

Career For 10th Fail: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी …

ब्रह्मांडामध्ये 13000000 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? शास्त्रज्ञांनी Photo दाखवत सांगितली भारावणारी गोष्ट

James Webb Telescope Image: जगाच्या उत्पत्तीच्या वेळी अवकाशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या होत्या? या विश्वातील …