‘या राज्यात शांतता सुव्यवस्था….’, मराठा मोर्चाचा प्रश्न विचारल्यानंतर CM शिंदेंनी करुन दिली आठवण

Republic Day 2024: महाराष्ट्र पुरोगामी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे. या राज्यात शांतता सुव्यवस्था राखली जाते. राज्यात सलोख्याचं वातावरण असून ही परंपरा आहे अशी आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) ध्वजारोहण (Flag Hosting) केलं. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आऱक्षणासंबंधी (Maratha Reservation) प्रश्न विचारलं असता त्यांनी कायदा सुव्यवस्थेची आठवण करुन दिली. 

“महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना अभिवादन. तसंच घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही अभिवादन. हे वर्ष महाराष्ट्राचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्राची प्रगती, सर्वांगीण विकास हाच ध्यास ठेवून सरकार काम करत आहे. सर्व घटकांना न्याय देणारं हे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात आघाडी घेतली असून, देशासाठी विकासाचं इंजिन ठरलं आहे. महाराष्ट्र परदेश गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. स्वच्छ राज्याचा पुरस्कारही मिळाला आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या, सर्व घटकांच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येवो यासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

हेही वाचा :  1 March New Rules: 1 मार्चपासून बदलणार हे नियम! तुमचं महिन्याचं बजेट बिघडण्याची शक्यता

“नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्तेकडे जात आहे. या देशाचा विकास जोरदारपणे, वेगाने होत आहे. देशाचा नावलौकिक वाढत असून आदराने नाव घेतलं जात आहे. नरेंद्र मोदींचं 5 ट्रिलियन डॉलर्सचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरचं योगदान पूर्ण करेल असा विश्वास देतो,” असंही त्यांनी सांगितलं. 

यावेळी त्यांना मराठा आंदोलनाबद्दल विचारलं असता, एकनाथ शिंदेंनी त्यांनाही शुभेच्छा दिल्या. “मराठा आंदोलकांनाही शुभेच्छा. महाराष्ट्र पुरोगामी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे. या राज्यात शांतता सुव्यवस्था राखली जाते. राज्यात सलोख्याचं वातावरण असून ही परंपरा आहे. त्यामुळे मी शुभेच्छा देतो,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“आपल्या देशाचा अमृत महोत्सव आहे. त्यामुळे आपल्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे. महाराष्ट्र देशाच्या विकासात योगदान देत असून कमी पडणार नाही. महाराष्ट्र आघाडीवर राहील. नागरिकांचं राज्याप्रती जे प्रेम आहे ते वाढत जावो,” अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …