1 March New Rules: 1 मार्चपासून बदलणार हे नियम! तुमचं महिन्याचं बजेट बिघडण्याची शक्यता

Rule Change 1st March: वर्षातील सर्वात छोटा महिना अशी ओळख असलेला फेब्रुवारी मंगळवारी संपणार. यानंतर आर्थिक वर्षातील शेवटचा माहिना म्हणजेच मार्च महिन्याची सुरुवात होईल. ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिना सुरु होण्याआधी काही नियम सरकारने बदलले होते तसेच आता मार्चच्या सुरुवातीलाही अनेक दैनंदिन घडामोडींसंबंधित नियम बदलले जाणार आहेत. यामध्ये सोशल मीडिया, बँकेची कर्ज, एलपीजी सिलेंडर, बँकेच्या सुट्ट्या यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच ट्रेनच्या टाइमटेबलमध्येही मोठा बदल होणार आहे. चला जाणून घेऊयात मार्च महिन्यामध्ये कोणते नवे नियम लागू होणार आहेत…

बँका कर्ज महाग करणार (Bank Loan) –

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच रेपो रेट वाढवले आहेत. त्यामुळेच आता बँका एमसीएलआर दरांमध्ये वाढ करणार आहेत. याचा थेट परिणाम कर्ज घेणाऱ्यांबरोबरच ईएमआयवर पडणार आहे. कर्जाचे व्याजदर वाढणार आहेत. तसेच ईएमआयचा भारही अधिक वाढणार असून याचा कर्ज घेणाऱ्यांना खिसा अधिक हलका होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  Maharashtra Weather update: शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी

एलपीजी आणि सीएनजीचे दर निश्चित होणार (LPG Price CNG Price) –

या शिवाय प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एपलपीजी, सीएनजी आणि पीएनजी गॅसचे दर निश्चित केले जातात. मागील वेळेस एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नाही. मात्र यंदा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दर वाढवले जाण्याचे शक्यता आहे.

ट्रेनच्या नियमांमध्ये बदल (Train Time Table) –

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे. मार्च महिन्यामध्ये ट्रेनच्या बदलेल्या वेळापत्रकाची घोषणा होऊ शकते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 1 मार्चपासून हजारो पॅसेंजर ट्रेन आणि 5 हजार मलागाड्यांचं टाइम टेबल बदलणार आहे.

सोशल मीडियासंदर्भातील बदल (Social Media Rules) –

सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजेच सोशल मीडियासंदर्भातील नियमही मार्च महिन्यात बदलू शकतात. यामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्वीटवर लगाम लावला जाण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करण्यासंदर्भातील नियम लागू होणार आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या युझर्सकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाणार आहे.

बँका राहणार बंद (Bank Holiday) –

याशिवाय मार्च महिन्यात देशभरातील बँका 12 दिवस बंद राहतील. यामध्ये होळी, नवरात्रीसारख्या प्रमुख सणांच्या दिवशी असलेल्या सुट्ट्यांचा सामवेश आहे. तसेच नियमित सुट्ट्याही या 12 दिवसांमध्ये गृहित धरण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करणं किंवा त्याचं योग्य नियोजन करणं फायद्याचं ठरु शकतं.

हेही वाचा :  Ajit Pawar : मी वादग्रस्त विधान केलेले नाही, राज्यपालांनी वादग्रस्त विधान केलेय - अजित पवार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …