Mahatma Gandhi 75th Death Anniversary: महात्मा गांधींचे ‘हे’ अनमोल विचार बदलतील तुमचं जीवन!

Mahatma Gandhi Punyatithi 2023: इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करणाऱ्या भारतातील एक शूर स्वातंत्र्यसैनिक मोहनदास करमचंद गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे पालन केले. या मार्गाचा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले. म्हणून हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. यासोबतच याला हुतात्मा दिन असेही म्हणतात.

भारतात, राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची पुण्यतिथी 30 जानेवारी रोजी शहीद दिन म्हणून साजरी केली जाते. बापूंनी सत्य आणि अहिंसा हे इंग्रजांविरुद्धचे सर्वात शक्तिशाली शस्त्र बनवले होते, त्यामुळे आजही त्यांचे विचार लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. दरवर्षी 30 जानेवारी रोजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलांचे प्रमुख (लष्कर, वायुसेना आणि नौदल) दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतात.

वाचा: Google च्या ‘या’ निर्णयामुळे अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सची होणार चांदी, कसं ते जाणून घ्या!

‘बापू’ म्हणजेच महात्मा गांधींजी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही ‘जिवंत’ आहेत. जे देशवासीयांना उत्साह, साहस आणि यशाकडे वाटचाल करत राहण्याची प्रेरणा देतात.

हेही वाचा :  'द कश्मीर फाइल्स' मोफत दाखवणाऱ्यांवर भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, खरा राष्ट्रवाद… | Vivek Agnihotri erupted after the announcement of The Kashmir Files for free abn 97

1. क्षमा करणे ही बलवान व्यक्तीची ओळख आहे. 

2. पहिले तुम्हाला दुर्लक्ष करतील, त्यानंतर तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील त्यानंतर तुम्ही जिंकाल.

3. शहाणा माणूस कृती करण्यापूर्वी विचार करतो आणि मूर्ख माणूस कृती केल्यानंतर विचार करतो. 

4. आनंद तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही जे विचार करता, विचार अमलात आणतात. 

5.  कोणतेही काम करत असाल तर ते प्रेमाने करा अन्यथा ते करू नका.  

6. विश्वास नेहमी तर्काने तोलला पाहिजे. विश्वास आंधळा झाला की मरतो.

7. भीती हा शरीराचा आजार नाही तर तो आत्म्याला मारतो.

8. असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात, असे शिका की तुम्ही कायमचे जगणार आहात.

9. चूक करणे हे पाप आहे, पण चूक लपवणे हे त्याहून मोठे पाप आहे.

10. तुम्ही दररोज तुमच्या भविष्यासाठी तयारीत राहा. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …