दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय

Maharashtra Board Exam 2023-24: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही परीक्षांसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ 3 तास 10 मिनिटांचा असणार आहे. 

यापूर्वीही बोर्डाच्या परीक्षांमध्ये 10 अतिरिक्त मिनिटं ही निर्धारित वेळेच्या आधी वाढवून दिली जायची. म्हणजे 11 चा पेपर असेल तर 10.50 पासून तो सुरु व्हायचा. प्रश्नपत्रिकेचं आकलन करण्यासाठी हा वेळ वाढवून दिला जात होता. मात्र अनेक कॉपी प्रकरणं समोर येण्याचं प्रमाण हे चिंताजनक होतं. अनेकदा पेपर फुटल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. त्यामुळेच आता बोर्डाने मागील वर्षाप्रमाणे यंदाही पेपरचा कालावधी संपल्यानंतर निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं अधिक वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र परिक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावं लागेल, अशा सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत. 

बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या काळात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे. 

हेही वाचा :  विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी प्रयत्न करा, शिक्षणमंत्र्यांचे आवाहन

दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार, दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आणि 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Mahavitaran Bharti: तुम्ही पदवीधर आहात? तुमचं बीई किंवा बीबीए झालंय आणि तुम्ही नोकरी शोधताय? तर …

INDIA Alliance : ‘आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण…’ उद्धव ठाकरेंचा घणाघात

INDIA Alliance Press Conference : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज लोकसभेच्या …