Virla Video : स्वामी कसे बसतात? 6 महिन्याच्या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून व्हाल फिदा!

Shri Swami Samarth Viral Video :  मुंबई, कोकणासह जगभरात श्री स्वामी समर्थांचे लाखो भक्त आहे. सोशल मीडियावर स्वामी समर्थ यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मठात हजारो भक्त दर्शन घेत असतात. स्वामी समर्थ यांचे विचार आणि उपदेश घराघरांमध्ये आचरण केले जातात. त्या घरातील चिमुकल्यांना लहानपणापासून स्वामी आजोबांची गोष्ट आणि शिकव दिली जाते. लहान मुलं अगदी निरागस असतात. ओल्या मातीला जसा आकार दिला जातो तशी त्याची निर्मिती होते. तान्हुल्यांचंही तसंच असतं, लहान वयातच त्यांना जसा आकार तुम्ही देता तसं ते घडतात. (How does Sri Swami Samarth sit 6 month old girl InstagramVideo viral on Social media trending now)

स्वामी कसे बसतात? 

सध्या सोशल मीडियावर 6 महिन्यांच्या तान्हुलीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली बेडवर खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ सुरु असताना एका महिलेचा आवाज येतो ती कदाचित त्याची आई असावी. तिने त्या इवल्याशा जीवाला विचारलं बाळा स्वामी कसे बसतात? त्या महिलेच्या प्रश्नानंतर चिमुकलीचं कृत्य सर्वांना थक्क करत आहे. 

हेही वाचा :  Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर

ही चिमुकली चक्क श्री स्वामी समर्थ कसे बसतात यांची नक्कल करुन दाखवते. हे पाहून प्रत्येक जण त्या चिमुकलीच्या प्रेमात पडले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील darshana_shivlakshmi या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 

दरम्यान हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत या व्हिडीओ 6 लाख लाइक्स आणि लाखो कमेंट्सचा पाऊस पडला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चिमुकलीसह त्यांच्या पालकांचं कौतुक करत आहेत. 
 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …