‘…म्हणून ‘लुंगी डान्स’ गाण्यातील ‘तो’ शब्द बदलला’, तब्बल 14 वर्षांनी रोहित शेट्टीचा खुलासा

Rohit Shetty Lungi Dance Lyrics Change : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा प्रत्येक चित्रपट हा कायमच सुपरहिट असतो. त्याच्या सुपरहिट चित्रपटांची यादी मोठी आहे. याच यादीतील एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चेन्नई एक्सप्रेस. भरपूर ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या शेवटी असलेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. पण तुम्हाला माहितीये का, या गाण्यातील एक शब्द बदलण्यात आला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. 

‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’ हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यातून दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांना मानवंदना देण्यात आली होती. हे गाणे हनी सिंग याने गायले होते. या गाण्याला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळाला होता. या गाण्यात दीपिका आणि शाहरुख यांच्या हुकस्टेपही चर्चेत होत्या. पण नुकतंच दिग्दर्शक रोहित शेट्टी याने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ‘लुंगी डान्स’ या गाण्याचा किस्सा सांगितला आहे. 

यावेळी तो म्हणाला, “चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात लुंगी डान्स हे गाणं नव्हतं. शेवटच्या क्षणी हे गाणं त्यात टाकण्यात आले होते. शाहरुख खान आणि हनी सिंग हे एकत्र भेटले होते  आणि त्यांनी मलाही फोन करुन बोलवलं. त्यावेळी शाहरुख म्हणाला, माझ्याकडे एक गाणं आहे, तुला ते ऐकायची इच्छा आहे का? हे गाणं फारच मस्त आहे. यानंतर मी शाहरुखची विनंती ऐकत हनी सिंगला ते गाणं शेवटी टाक, असे सांगितले होते.”

हेही वाचा :  Instagram : इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवायचे आहेत? 'या' ५ सोप्या स्टेप्स करा फॉलो

रोहित शेट्टीने बदललेला ‘तो’ शब्द कोणता?

“पण चित्रपटाचा निर्माता म्हणून मला प्रेक्षकांच्या आवडी निवडी माहिती आहेत. त्यामुळे मला या गाण्यातील एका विशिष्ट ओळीबद्दल चिंता वाटत होती. हनी सिंगने गायलेल्या लुंगी डान्स या गाण्यात ‘कोकनेट मै वोडका मिलाके’ असा शब्दप्रयोग करण्यात आला होता. मला त्यातील वोडका हा शब्द खटकत होता. त्यामुळे मी हनीला विनंती केली आणि त्याला सांगितले की आपण ‘कोकनेट मै वोडका मिलाके’ या शब्दाऐवजी कोकनेट मै लस्सी मिलाके असा शब्दप्रयोग करु शकतो का?. त्याने माझ्या विनंतीला मान देत हा बदल केला. 

त्यावेळी हनीने मी तुझ्यासाठी यापेक्षा जास्त सभ्य होऊ शकत नाही, असा टोलाही त्याने मला लगावला. पण मला आनंद आहे की हे गाणं सुपरहिट झाले. मी या गाण्यात तो शब्द ठेवला नाही, कारण अनेक लहान मुलं माझा चित्रपट पाहण्यास येतात”, असा किस्सा रोहित शेट्टीने सांगितला. 

दरम्यान ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण हे दोघे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. या चित्रपटाचे बजेट 70 कोटी होते. तर या चित्रपटाने 423 कोटींची कमाई केली होती. 

हेही वाचा :  “मीच मूर्ख होती की त्याला दुसरी संधी दिली…”, दीपिका पदुकोणने केला एक्स बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

20 जूनपासून बंद होतेय गुगलची ही सर्व्हिस, 4 वर्षांपूर्वीच झाली होती लाँच

Google One Vpn Service: गुगल क्रोम हा आपल्या रोजच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. गुगलने …

Google I/O 2024 Highlights: जबरदस्त! मानवी स्मरणशक्तीला शह देणार Google चं ‘हे’ टूल; हरवलेल्या गोष्टीही शोधणार

Google I/O 2024 : तंत्रज्ञान क्षेत्रात जग बरंच पुढे जात असतानाच गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांकडूनही नवनवीन …