पंतप्रधान मोदींचा महिन्याभरात दुसरा महाराष्ट्र दौरा; देशातल्या सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे आज लोकार्पण

प्रताप नाईक, झी मीडिया, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी अटल सेतूच्या लोकार्पण केले होते. तसेच नाशिक येथे युवा महोत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी सोलापूरमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबत अमृत योजनेंतर्गत इतर दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचेही पंतप्रधान भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे. 

कसा असेल पंतप्रधानांचा दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान मोदी यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. कुंभारी येथील रे नगरच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि रे नगर मॉडेल हाऊसची पाहणी करून ते विडी कामगारांशी संवाद साधणार आहेत. या संवादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे . यावेळी एकूण 15 हजार घरकुलाचे वाटप केलं जाणार आहे. या घरकुलांमुळे असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. पंतप्रधान मोदी यांचा दीड तासाचा एकूण दौरा असून यावेळी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्यपाल उपस्थित असणार आहेत. या घरकुल लोकार्पण सोहळ्यात रे नगर प्रकल्प समितीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापुरी चादर, हातमागावर विणलेली शाल तसेच फेटा देवून सत्कार केला जाणार आहे.

हेही वाचा :  तयारीला लागा! राज्यात 100 टक्के पोलिस भरती होणार, सरकारचा मोठा निर्णय

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी रे नगर परिसरात भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेनेचे झेंडे झळकवण्यात आले आहेत. यासोबतत रस्त्यात विविध ठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधानांच्या सभास्थळी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी पोलिसांच्या विशेष सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सोलापुरात जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष सूचना दिल्या आहेत. नागरिकांना मोदींच्या सभेत सहभागी होण्यासाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून प्रवेश मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेत मोठ्या बॅग, झेंडे, बॅनर, राजकीय पक्षांचे बॅनर, पाण्याच्या बॉटल, खाद्यपदार्थ, आणण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच घाईगडबड होऊ नये, सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी पूर्ण व्हावी यासाठी सर्वांना वेळेत येण्याचे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आवाहन केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याच्या एक तास अगोदर नागरिकांना सभास्थळी पोहचाव लागणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …