Driver Strike: स्कूल बस चालकांनी संपात सहभागी होऊ नये, नाहीतर…; शिक्षणमंत्र्याचा थेट इशारा

Truck Driver Strike School Bus Operator:  केंद्र सरकारने हिट अ‍ॅण्ड रनसंदर्भात पारित केलेल्या नव्या कायद्याविरोधात वाहतूक संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी या संपाचा दुसरा दिवस असून याचा परिणाम शाळांच्या बसेसवरही होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालकांच्या संघटनांनी घेतला आहे. यासंदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्कूल बसच्या संघटनांनी या संपात सहभागी होऊ नये असं आवाहन केलं आहे. तसेच संपात सहभागी झाल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल असा थेट इशाराच शिक्षणमंत्र्यांना दिला आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये. नाहीतर कारवाईचा वेगला विचार केला जाईल. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी सर्वांना घ्यायला हवी असं दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणीही वागू नये. उद्या म्हणजेच बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असंही केसरकर म्हणाले.

हेही वाचा :  ...तर तुमचा पॅन कार्ड काहीच उपयोगाचा नाही, आयकर विभागाने स्पष्ट सांगितलं

विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता

हिट अ‍ॅण्ड रनसंदर्भातील कायद्याविरोधात वाहतूक संघटनेनं सुरु केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. संपामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने बसमधील डिझेलची बचत करण्याच्या उद्देशाने बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे. नाताळाच्या सुट्ट्यांनंतर राज्यातील काही शाळा आज सुरु झाल्या असून काही उद्या सुरु होणार आहेत. मात्र इंधनाच्या चिंतेने स्कूल बस मालकांनी बस रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच शाळांनाही यासंदर्भातील कल्पना बस चालकांनी दिली आहे.

अशा आहेत नव्या तरतुदी

एखादा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरुन पळून जाण्याच्या प्रकाराला हिट अ‍ॅण्ड रन असं म्हणतात. नव्या कायद्यानुसार ट्रक चालकांकडून अपघात झाला त्यांनी एखाद्या वाहनाला धडक दिली तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. पूर्वी हा दंड 5 लाख इतका होता. तसेच या प्रकरणामध्ये लगेच जामीनही मंजूर केला जात होता. मात्र या कायद्यात बदल करण्यात आल्याने जामीन मिळणही कठीण होणार आहे. ट्रक चालकाकडून अपघात झाला आणि अपघातात जखमी व्यक्तीला मदत न करता ट्रक चालक अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नवीन कायदे फारच कठोर असल्याचा आरोप ट्रकचालकांनी केला आहे. त्यामुळे या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. मात्र नवीन कायद्यामध्ये अपघातानंतर जखमींना मदत करणाऱ्या त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकांना या शिक्षेमधून सूट मिळणार आहे.

हेही वाचा :  ठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार? आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा?

नवी मुंबईतही पोलिसांना मारहाण

सोमवारी नवी मुंबईमधील उलवे येथे बेलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ट्रक चालक फारच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. बेलापूर महामार्ग रोखून धरण्याचा ट्रक चालकांचा डाव हाणून पाडला. एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतलं. यानंतर पनवेल-सायन रस्ता ट्रक चालकांनी रोखल्याने वाहतूक कोंडी झाली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …