Savitribai Phule Speech : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषणे

Savitribai Phule Jayanti : देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींना प्रेरणा दिली आहे. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महिला सशक्तीकरणाकरिता त्यांनी आपल संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे. 

सावित्रीबाई फुले त्यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी केली जाणार आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील शाळांमध्ये तसेच इतर ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येते. यावेळी शाळांमध्ये त्यांच्यावर आधारित भाषणे सादर केली जातात. त्यानिमित्त आम्ही सावित्रीबाई फुले यांच्यावरील मराठीत भाषण कसे लिहायचे ते सांगणार आहोत.

सावित्रीबाई फुले भाषण निबंध पहिला

आदरणीय गुरुजन वर्ग आणि मझ्या बाल मित्र व मैत्रिणिंनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथे उपस्थित आहोत. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत.
बालविवाहावर बंदी, विधवांवरील अत्याचाराला लगाम लावणे आणि महिलांच्या कल्याणाचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तुत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते तर आईचे नाव लक्ष्मी होते.
सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या पालकांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. गावचे पाटील असणाऱ्या नेवासे यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते. घरची परिस्थिती चांगली असल्याकारणाने साहजिकच सावित्रीबाईंचे बालपण अतिशय मजेत आणि सुंदर गेले.
वयाच्या 9 व्या वर्षी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावातील 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ज्योतिराव फुले यांचे शिक्षणाकडे विशेष आकर्षक होते. ज्योतिराव इंग्रजीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला होता. ज्योतिराव फुलेंनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाई शिक्षित झाल्यानंतर त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे ठरवले.

हेही वाचा :  Nepal Plane Crash : विमानाने अचानक डावीकडे वळण घेतलं आणि... नेपाळ अपघाताचा थरारक Video समोर

1848 साली स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा गुन्हा होता. हे कार्य करत असताना वेळप्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सुद्धा त्यांनी सहन केली. समाजाची होणारी टीका सहन करत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात काढली. त्यानंतर हळूहळू 18 शाळा उघडल्या.

भिडे वाड्यात सुरू केलेली शाळा ही महाराष्ट्रातील पहिलीच मुलीची शाळा होती. त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागल्या. सुरुवातीला त्यांच्या शाळेमध्ये पाच ते सहा विद्यार्थिनी होत्या. पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. मुली शाळेत येत असल्यातरी सावित्रीबाई फुले यांना समाजाच्या टीकेला समोरे जावे लागत होते.

महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगावं लागणारा त्रास पाहून ज्योतिराव फुले यांनी विधवा स्त्रियांसाठी काही तरी मदत करण्याचं ठरवलं. दुर्दैवी स्त्रियांना दिलासा व आधार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले.
1897 मध्ये पुण्यात एक भयानक प्लेग ची साथ पसरली. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा उपाय योजला तेव्हा सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना त्या स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या. 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले.

सावित्रीबाई फुले भाषण निबंध दुसरा 

ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही
बुद्धी असुनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का ?

हेही वाचा :  शाळेत चिमुरड्यांच्या किंचाळ्या घुमल्या तरीही फुटला नाही पाझर, फी न भरल्याने मुलांना 2 तास ठेवलं कोंडून

ओळखलत का मला मी सावित्री. सावित्राबाई ज्योतीराव फुले सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या नव्या वर्षी ज्योतीराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी माझं लग्न झालं तो सामान्य माणूस नाही तर लाखो-करोड़ोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य त्यांना मी शेठजी म्हणायचे.
फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. माझा हात घर-घर कापत होता. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाटीवर लिहायला शिकवलं. मी पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेठजीच.
एकदाची शेठजींची सौ शिकली लिहायला शिकली, वाचायला शिकली आणि शेठजीसारखाच मोठा विचार करायला शिकली 1 जानेवारी होय. शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडे वाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी सुरु केलेली पहिली शाळा होती ती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा.
शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होत. वाघासारखे जगलात तर नाम होत. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशच होतो. घाबरण किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं.
सनातनांचा मात्र धर्म बुडाला. धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती. सर्व सामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसाकाय धर्म बुडतो यांचा, इतका तकलादू असू शकतो का धर्म, धर्म माणसासाठी असतो की, धर्मासाठी माणूस.
शेठजी घरोघरी जाऊन मुलीना गोळा करत होते. त्यांच्या आईबापांना समजावत होते पण अक्षराच्या आळ्या होऊन त्या नवर्याच्या जेवणाच्या ताटात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना ते पटण्यासारखं नव्हत. ते शिक्षकांना वाळीत टाकण्याच्या धमक्या देत होते. शेठजी विचारात पडले मी शेठजीना म्हणाले,
शेठजी कंचा विचार करताय क्या हाय नव्ह म्या ‘शिकविण पोरीना’ असं म्हणून मी सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माणूस माझ्या समोर आला तो म्हणाला,’ऐ बाई। कुठे निघालीस आमच्या पोरींना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवण. कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी नेवासी पाटलांची कन्या आणि ज्योतीराव पहेलवानांची पत्नी होते.
मग उचलला हात आणि दिली त्याच्या थोबाडीत त्याक्षणीच. त्याला सुनावल आज समोर आलायस थोबाड फुटलय पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. कसाबसा सावरत तो तिथून निघून गेला. मोठ्या आशेने माझे अब्रू हरण बघायला आलेले बघे त्याची बेअब्रू झालेली पाहताच तिथून निमूटपणे निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केल. शिव्या दिल्या, दगडफेक केली, मी गप्प राहिले. माझा हात धरून मला दम देतो. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता.
दिवसा मागून दिवस गेले अंधारात उजेड येत होता. लोकांना शिक्षणाच महत्त्व कळू लागलं. 4 वर्षातच आमच्या 18 शाळा झाल्या. पुढे बालहत्या प्रतिबंधाचे काम, बाईला घराबाहेर न पडू देणं, सती जाणं या सर्वांवर आम्ही विरोध केला. आनंद होता तो आयाबाया शिकत होत्या. अश्भयातच भयंकर प्लेग पसरला, आम्हीं रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना मला हि प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी माझा मृत्यू झाला.
म्हणून म्हणते स्त्रीला शिकू द्या, विचार करू दया कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते व पशुत्व हटते बरं येते ह मी .
जय हिंद जय महाराष्ट्र…..

हेही वाचा :  मुलींसाठी पहिली भारतीय शाळा उघडली, समाजव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला; सावित्रीबाई फुलेंचे आपल्यावर अनंत उपकार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …