रेशनकार्डवर मुलाचं नाव कसं जोडालं; ऑनलाइन संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Ration Card Name Add: रेशनिंग कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. भारत सरकारकडून रेशन कार्ड जारी करण्यात येते. ओळखपत्राचा पुरावा आणि रहिवाशी प्रमाणपत्र म्हणूनही रेशन कार्ड महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर सबसिडी असलेले खाद्यपदार्थ जसे की, गहू, तांदूळ, साखर, रॉकेल, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येऊ शकतात. 

रेशन कार्डचे फायदे

रेशनिंग कार्ड हे एक वैध ओळखपत्र आणि रहिवासी दाखला आहे. याचा उपयोग बँकेत अकाउंट सुरू करणे, पासपोर्ट आणि अन्य सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी केला जातो. 

सबसिडी असलेले खाद्यपदार्थ खरेदी करु शकता

रेशनकार्ड धारक सबसिडी असलेले खाद्यपदार्थ जसं की साखर, गहू, रॉकेल, तेल, तांदूळ यासारख्या पदार्थांवर सूट मिळते. गरीब आणि आर्थिक परिस्थीती कमी असलेल्या लोकांना अन्न मिळावे याची दखल घेतली जाते. 

अन्य सरकारी योजनांचा लाभः काही सरकारी योजना जसं की पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही फक्त रेशनकार्ड धारकांसाठीच उपलब्ध आहे. रेशन कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  तुम्ही रेशन आणि आधार कार्ड लिंक केलं का? नसेल तर लगेच करा, 'ही' शेवटची तारीख

1. आधारकार्ड
2. निवासप्रमाण पत्र
3. कुटुंबातील मुख्य व्यक्तीचे ओळखपत्र
४. कुटुंबातील मुख्य व्यक्तीचे ओळखपत्र
५. उप्तन्नाचे प्रमाणपत्र
६. रेशन कार्डची वैधता साधारणतः पाच वर्षांपर्यंत असते. त्यानंतर राज्य अन्न प्रशासनाला अर्ज करावा लागतो. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नाहीये. तर, तुम्ही राज्याच्या अन्न विभागाच्या वेबसाइटवर जाऊन किंवा जवळच्या अन्न आणि सुरक्षा विभागाच्या केंद्रात जाऊनही अर्ज करु शकतात. 

ऑनलाइन पद्धतीने नाव दाखल करा

रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव जोडण्यासाठी ऑनलाइन अर्ज देऊ शकता. ही सुविधा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, केरल, कर्नाटक, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगढ़, गोवा, गुजरात, असम, मेघालय, त्रिपुरा, सिक्किम, नागालैंड, अरुणाचल प्रदेश, मिजोरम और मणिपुर या राज्यांत उपलब्ध आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ही प्रक्रिया फॉलो करा

1 सुरुवातीला अन्न सुरक्षा विभागाच्या वेबसाइटवर जा

2 रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एका सदस्याचे नाव जोडण्यासाठी त्या पर्यायावर क्लिक करा

3 लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा

4 फॉर्ममध्ये  गरजेची माहिती भरा, तुमचं नाव आणि रेशन कार्ड नंबर, मुलाचे नाव, जन्म तिथी, निवासप्रमाण पत्र संख्या आणि आधार कार्ड संख्या

हेही वाचा :  पुण्यात खरंच अमित शाहांना भेटलात का? जयंत पाटील म्हणाले, 'माझ्यासारख्या गरीबाला का...'

5 तुमच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

6 त्यानंतर अर्जाची फी भरा

7 अर्ज सबमिट करा

अर्ज जमा केल्यानंतर एक नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. या नोंदणी क्रमांकामुळं तुम्ही रेशनकार्डची सध्याची स्थिती पाहू शकात. 

रेशनकार्डवर मुलाचे नाव टाकण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1. रेशन कार्ड
2. मुलाचे जन्म प्रमाणपत्र
3. कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड
3. तुम्ही यापैकी कोणत्याही एका कागदपत्राशिवाय अर्ज केल्यास, अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्ही संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …