होय..फडणवीसांनी त्यांच्या वजनानेच बाबरी पाडली असेल… उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Uddhav Thackeray On Babri Mashid Collaps: राम मंदीरासाठी आम्ही आमचे योगदान दिले होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतरही मंदीरात जाऊन आलो आहे. अयोध्येत मी कधीही जाईल. कधीही दर्शन घेईन. याचे राजकारण होऊ नये, असे ठाकरे म्हणाले. बाबरी मशीद पडली तेव्हा भाजपचेच नेते होते, शिवसेनेचे कोणी नव्हते असे विधान फडणवीसांनी केले होते. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. तेच (फडणवीस) चढले असतील आणि त्यांच्या वजनाने पडली असेल तर माहिती नाही अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

बाबरी पडल्यानंतर सीबीआयचे स्पेशल कोर्ट झालं, आरोपी म्हणून नावे प्रसिद्ध झाली. त्यात स्थानिक शिवसैनिक, अनेक खासदार आणि 109 पदाधिकारी आहेत. मी स्वत: 3 वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलोय. जे दावा करतायत त्यांनी हे पाहायला हवं, असे यावेळी संजय राऊत म्हणाले. 

ते शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलतात, त्यावरुन त्यांची मानसिकता कळते. त्यांचा गृहपाठ कमी पडत असेल. तुम्हीच स्वत: ढोंगी बुरखा फाडत असल्याचे ते म्हणाले. मीच सगळ केलं अशा कोणी फुशारकी मारु नये. आडवाणींनी ही रथयात्रा काढली नसती तर हे शक्य नव्हत. हा अस्मितेचा लढा होता जो पूर्ण झाला, असे ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा :  94 किलो मुलाने ही साधी घरगुती ट्रिक करून घटवलं 25 किलो वजन,दिसू लागला हिरोसारखा Slim-Trim

काय म्हणाले होते फडणवीस?

बाबरी मशीद पाडली होती तेव्हा तिथे भाजपसोडून कोणीच नव्हते. हे केवळ वाचाळवीर आहेत. कुठल्या संघटनेने क्रेडीट घ्यायचे नाही, कारसेवकांनी मशीद पाडली सांगायचे, असे आम्हाला सांगण्यात आले होते. आम्ही शिस्त पाळणारे होतो. म्हणून आम्ही कारसेवकांचे नाव सांगितले. दरम्यान कोणीतरी बाळासाहेबांना प्रश्न विचारला, तुमच्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली का? तेव्हा त्यांनी माझ्या शिवसैनिकांने बाबरी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे विधान केल्याची आठवण फडणवीसांनी करुन दिली. बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते तिथे होते, असे फडणवीसांनी सांगितले. 

निवडणुका कधी?

30 एप्रिलच्या आत निवडणुका होतील. तसे झाल्यास तुमचा निकाल चांगला लागेल असे भाजपला कोणीतरी सांगितले असल्याचे ठाकरे म्हणाले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या …

महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या सह्याद्रीच्या जन्माची गोष्ट

सह्याद्री आणि छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे महाराष्ट्रा लाभलेला शौर्याचा वारसा आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण आणि …