After Election 2022 Result Memes Viral On Social Media | “मी पुन्हा येईन..” उत्तर प्रदेशात भाजपाने सत्ता राखल्याने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, शिवसेनेला धरलं धारेवर


योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने करून दाखवलं. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. भाजपाच्या विजयानंतर सपा, बसपा आणि काँग्रेसच्या नवनवीन मीम्स येत आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपा दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कारण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दुसऱ्यांदा एकहाती सत्ता सत्ता मिळवणं कठीण आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने करून दाखवलं. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. काँग्रेसला मात्र उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला असून जनतेने प्रियंका गांधी यांना नाकारलं आहे. समाजवादी पक्षाने मात्र भाजपाला चांगली लढत दिल्याचं दिसत आहे. मात्र सत्तेत येण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.

निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. भाजपाच्या विजयानंतर सपा, बसपा आणि काँग्रेसवर नवनवीन मीम्स येत आहेत. इतकंच काय तर नेटकऱ्यांनी शिवसेनेलाही सोडलं नाही. हे मीम्स इतके मजेशीर आहेत की वाचून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

हेही वाचा :  विद्यापीठ निवडणुकांतही ठाकरे-शिंदे गट समोरासमोर

उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता येत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लखनऊमधील कार्यालयाबाहेर होळी खेळत सेलिब्रेशन केलं.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का

Big News For Bank Customer: भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation …

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …