समुद्रकिनारी वाहून आले रहस्यमयी जीव, लोक म्हणाले- जलपरी तर नाही ना?

Globster Like Mermaid: या पृथ्वी तलावर असे अनेक रहस्यमयी जीव आहेत. जे पाहून संशोधकही अचंबित होतात. समुद्रकिनारी वाहून आलेल्या अशाच एका रहस्यमयी जीवाचा फोटो सध्या सोशल मिडियावर तुफना व्हायरल होत आहे. जलपरी तर नाही ना… असा प्रश्न हा फोटो पाहून लोक उपस्थित करत आहेत. अनेक कथांमध्ये जलपरीचा उल्लेख असतो. यामुळे जलपरी सारखा दिसणारा हा मासा चर्चेत आला आहे.  खरचं जलपरी अस्तित्वात आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. 

कथा सिनेमांमध्ये जलपरीचा उल्लेख

अनेक कथा तसेच सिनेमांमध्ये जलपरी पहायला मिळतात. मात्र, जलपरी ही फक्त कल्पना आहे. प्रत्यक्षाच जलपरी अस्तित्वात नाही. मात्र, व्हायरल झालेल्या या माशाचा आकार जलपरी सारखा आहे. यामुळे जलपरी अस्तित्वात असल्याचा दावा केला जात आहे. 

कुठे आढळला हा जलपरी सारखा दिसणारा मासा?

पापुआ गिनी या देशातील समुद्र किनाऱ्याजवळ हा जलपरी सारखा दिसणारा मासा सापडला आहे. या माशाला मरमेड्स ग्लोबस्टर (Globster Like Mermaid) असे नाव देण्यात आले आहे. 20 सप्टेंबर रोजी पापुआ न्यू गिनीमधील सिम्बरी बेटाच्या किनारपट्टीवर जलपरी सारख्या दिसणार्‍या या रहस्यमयी माशाचा मृतदेह आढळला होता. या माशाला पाहण्यासाठी स्थानिकांनी तुफान गर्दी केली होती. 

हेही वाचा :  5000 फूट बंकर, 30 खोल्या… मार्क झुकेरबर्ग जमिनीखाली घर का बांधतोय?

शास्त्रज्ञही आश्चर्यचकित

या माशाला पाहून शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले. लाइव्ह सायन्सच्या म्हणण्यानुसार हा सागरी प्राणी असू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.  या रहस्यमय प्राण्याबद्दल विविध प्रकारचे अंदाज लावले जात आहेत. काहींनी या माशाचे वर्णन समुद्री गाय असे केले आहे.  तर, काहींनी याला डॉल्फिन तर काहींनी याला शार्क असे म्हंटले आहे. मात्र, याचा आकार पाहता ही जलपरी असावी असा दावा अनेक जण करत आहेत. 

ग्लोबस्टर म्हणजे काय?

या माशाला  मरमेड्स ग्लोबस्टर असे म्हणण्यात आले आहे. समुद्री प्राण्यांचे अवशेष ओळखणे कठीण असते अशा जीवांना ग्लोबस्टर असे म्हणतात. सिंब्री बेटाच्या किनाऱ्यावर वाहून गेलेल्या या सागरी जीवारे शरीर कुजले अवस्थेत होते. यामुळे याचे ओळख पटवणे कठिण आहे. मात्र, याचा आकार पाहता ही जलपरी असावी असा दावा केला जात आहे.  वृत्तानुसार, स्थानिकांनी या सागरी जीवाते दफन केले आहे. न्यू आयर्लंडर्स ओन्ली नावाच्या  फेसबुक पेजवरुन  या विचित्र सागरी जीवाते फोटो शेअर करण्यात आले आहेत. स्थानिकांनी आधीच या सागरी जीवाचे दफन केल्यामुळे त्याचा आकार आणि वजन कळू शकले नाही.
 

हेही वाचा :  Crime News : गंमतीगंमतीत प्रेयसीचा खेळ खल्लास; प्रियकराने रचलेला बनाव पाहून पोलिसही सुन्न



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …