5000 फूट बंकर, 30 खोल्या… मार्क झुकेरबर्ग जमिनीखाली घर का बांधतोय?

Mark Zuckerberg : फेसबुकची मूळ कंपनी मेटाचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग सध्या कमाईत नंबर 1 एलॉन मस्क नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. झुकेरबर्गने गेल्या वर्षभरात 75.1 अब्ज डॉलरची संपत्ती कमावली आहे. दुसरीकडे, मस्कच्या संपत्तीत 93.9 अब्जची वाढ झाली आहे. पण  ही महत्त्वाची बातमी नाही. महत्त्वाची बातमी अशी आहे की, मार्क झुकरबर्ग जगातील सर्वात मोठे आणि आलिशान घर बांधणार आहे. मात्र हे घर जमिनीखाली असणार आहे.

फेसबुकचे संस्थापक आणि मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग अमेरिकेतील हवाईमध्ये भूमिगत बंकर बनवण्याच्या तयारीत आहेत. हवाई हे पश्चिम अमेरिकेतील एक बेट राज्य आहे. या कामात त्यांची पत्नी प्रिसिला चॅन त्यांना साथ देत आहे. प्रिसिला या ‘चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्ह’ची सह-संस्थापक आहेत.

टाईम्स मॅगझिनच्या एका अहवालात असे म्हटले आहे की झुकरबर्ग 5 हजार स्क्वेअर फूटमध्ये भूमिगत घर बांधत आहे. या बंकरमध्ये मेटलचा दरवाजा बसवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. जे इतर बंकरप्रमाणे काँक्रिटने भरले जाईल. झुकेरबर्ग 27 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयात सुमारे 2,240 कोटी रुपये किमतीचे हे घर बांधणार आहे. यामध्येच हे बंकर असणार आहे.

हेही वाचा :  हार्ट अटॅक ठीक 1 महिना आधी देतो त्याच्या येण्याचे संकेत, ही 12 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

या संपूर्ण 1400 एकर परिसरात डझनहून अधिक इमारती असतील. हवेलीत 30 खोल्या आणि 30 स्नानगृहे बांधली जात आहेत. या सर्व इमारती एका बोगद्याद्वारे एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. बोगद्यातून बाहेर पडण्यासाठी जिना बांधण्यात येणार आहे. तसेच इथे बांधण्यात येणारा बंकर सर्व प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम असेल. झुकेरबर्गच्या या बंकरच्या स्वतःचा ऊर्जेचा स्रोत असेल. त्यामुळे बाहेरून वीजपुरवठा बंद झाला तरी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

कशी असेल सुरक्षा?

इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर गुप्त कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाईल. इलेक्ट्रॉनिक लॉकसह साउंड प्रूफ दरवाजे इमारती आणि इतर एक्झिट आणि एंट्री गेट्समध्ये बसवले जातील. त्याचबरोबर वाचनालयासाठी गुप्त दरवाजा करण्यात येणार आहे. झुकेरबर्गच्या या घराची गणना जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये होईल अशीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हे भूमिगत बंकर का बांधले जात आहे, हे स्पष्ट झाले नाही. त्यानंतर, टाइम्सने याबाबत प्रश्न विचारला असता, झुकरबर्ग आणि चॅनचे प्रवक्ते ब्रँडी हॉफिन बार म्हणाले की, “दोन दशकांपूर्वीपासून इथे वादळापासून संरक्षणासाठी सुरक्षित कक्ष बांधण्यावर करात सूट देण्यात आली आहे. मार्क आणि प्रिसिला यांना कोओलाऊ रॅंचमध्ये वेळ घालवणे आवडते. इथले नैसर्गिक सौंदर्य त्यांना वाचवायचे आहे. जेव्हा झुकरबर्गने ते विकत घेतले तेव्हा येथे 80 लक्झरी घरे बांधण्याची योजना होती. मात्र आता केवळ एक टक्‍क्‍यापेक्षा कमी जमिनीवर काम सुरू आहे. बाकीच्या जमिनीचा वापर शेती, पशुसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि खुल्या मैदानासाठी केला जाईल.”

हेही वाचा :  Pune Crime: मुलीला लॉजवर नेले, नग्न फोटो काढले आणि तब्बल सहा महिने... UP, बिहार नाही तर पुण्यात घडली भयानक घटना



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …