नसबंदीनंतरही झाली मुलगी, बापाने थेट कोर्टात घेतली धाव; नंतर झालं असं काही…

राजस्थानमध्ये नसबंदी केल्यानंतरही एक महिला गर्भवती राहिल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. महिलेने मुलीला जन्मही दिला आहे. दरम्यान यानंतर दांपत्याने स्थानिक लोक अदालतमध्ये धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे. कोर्टाने निर्णय सुनावला की, सरकारने या कुटुंबाला 6 लाख रुपये द्यावेत. तसंच मुलीचं वय 21 वर्षं होईपर्यंत तिच्या शिक्षणाचा सगळा खर्चही उचलण्यात यावा. 

स्थायी लोक अदालतचे पूर्णवेळ अध्यक्ष सतीश कुमार व्यास यांनी आपल्या निर्णयात या जोडप्याला एका महिन्याच्या आत 6 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. 

पीडित दाम्पत्याच्या वतीने बाजू मांडणारे वकील खुशवंत सिंग सांडू यांनी सांगितलं की, राज्य सरकारला नुकसानभरपाईची रक्कम देण्याबरोबरच, लोकअदालतीने नसबंदीनंतर जन्मलेल्या मुलीला ती 5 वर्षांची झाल्यानंतर 21 वर्षांची होईपर्यंत, संगोपनासाठी जोडप्याला राज्य सरकारने दरमहा 10,000 रुपये दिले पाहिजेत असाही आदेश देण्यात आला आहे. 

तसंच वयाच्या 5 वर्षांनंतर मुलगी सरकारी किंवा खासगी शाळेत शिकत असताना ती पदवीधर होईपर्यंत तिचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. मुलीला वैद्यकीय सुविधांची गरज भासल्यास, 21 वर्षे वयापर्यंत मुलीला राज्य सरकारकडून मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

हेही वाचा :  झुलवा पाळणा! 58 वर्षांची आज्जी बनली आई, दिला जुळ्या बाळांना जन्म

3 मुलं झाल्यानंतरही पालक निवडणूक लढवू शकतात

कोर्टाने याप्रकरणी आणखी एक आदेश दिला असून, हे जोडपं निवडणूक लढवू शकतं असं स्पष्ट केलं आहे. नवजा मुलीच्या पालकांना तीन मुले असूनही भविष्यात कोणतीही निवडणूक लढवता येईल, असा आदेश लोक अदालतने दिला आहे. नसबंदीनंतर महिलेने मुलीला जन्म दिला असल्याने तिला तीन अपत्ये असल्यास तिला निवडणूक लढविण्यापासून रोखले जाणार नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …