‘इंडिया’ला निरोप देत ‘या’ पत्रकाराने उचललं हमासविरोधात शस्त्र, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Israel-Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्ब वर्षाव (Bomb Attack) सुरू केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांची अतोनात हानी झाली आहे. दोन्ही देशात मोठी जीवितहानी झाली आहे. युद्धात दोन्ही देशातील शेकडो नागरिकांचा बळी गेलाय. तर हजारो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्त्रायलवर (Israel) क्रूर हमासनं (Hamas) 5 हजार रॉकेट्स डागून हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्रायलनं युद्धाची घोषणा केलीये. 

इस्त्रायल-हमास युद्धात सामान्य लोकं होरपळत आहेत. सतत होणाऱ्या रॉकेट हल्ल्याने इस्त्रालयमधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक घरं उद्ध्वस्थ झाली असून लोकं जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपत आहेत. 

पत्रकाराचं ट्विट व्हायरल
युद्धजन्य परिस्थितीत एका पत्रकाराचं  (Journalist) ट्विट चांगलंच व्हायरल (Social Media) झालं आहे. इंडियाला निरोप देत शस्त्र हाती घेत असल्याचं या पत्रकाराने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. ट्विटमध्ये त्याने पुढे म्हटलंय. माझा देश इस्त्रायची सेवा आणि रक्षा करण्यासाठी मी जात आहे. माझ्या पत्नीचा मी निरोप घेतोय. याच्यापुढे माझ्यातर्फे माझी पत्नी ट्विटरवर पोस्ट करेल. वास्तविक पोस्ट करणारा एक इस्त्रायली पत्रकार असून त्याच्या पत्नीचं नाव ‘इंडिया’ असं आहे. आपल्या प्रिय पत्नीला सोडून युद्धासाठी जावं लागत  असल्याने त्याने आपल्या पत्नीसाठी ही पोस्ट लिहिली आहे. 

इस्त्रायलकडून चोख प्रत्युत्तर
इस्त्रायलची लढाऊ विमानं गेल्या 24 तासांपासून हमासवर सतत हल्ले करतायत. केवळ हवाई हल्लेच नाहीत तर जमिनीवरुनही IDFच्या कारवाया सुरु आहेत.इस्त्रायलच्या लष्कराकडून कोम्बिंग ऑपरेशन्स राबवण्यात येतंय. घरांची झडती घेत हमास अतिरेक्यांचा खात्मा केला जातोय. हमासकडून इस्त्रायलवर रॉकेट डागली जात आहेत. आकाशातून क्षणाक्षणाला केवळ मिसाईल्स आणि रॉकेट दिसतायत. 

हेही वाचा :  Share Market : निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर; सेंसेक्सची 'इतकी' मोठी उसळी

हे ही वाचा : इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले

युद्धाचे जगावर परिणाम
इस्त्रायल-हमास महायुद्धाचे परिणाम आता जगावर दिसू लागलेत. या युद्धामुळे तेलाचे भाव वाढलेत. कच्च्या तेलाच्या किमतीत 4.5 टक्क्यांची वाढ झालीये. अशात जगभरात तेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. इस्त्रायली लष्कराकडून Swords of Iron ऑपरेशन राबवण्यात येतंय. दहशतवादी हमासचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात येतायत. क्रूर हमासनं पूर्ण तयारीसह इस्त्रायलवर हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. या हल्ल्याची ना इस्त्रायली लष्कराला माहिती होती ना मोसादला. मात्र इस्त्रायलनं प्रत्युत्तरादाखल हल्ले करत मोर्चा संभाळलाय. दहशतवादी हमासचा नेता आयमन यूनिसचा खात्मा करण्यात आलाय.आता इस्त्रायलनं क्रूर हमासचा करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवलंय..



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, ‘मंत्री महोदयांच्या दबावामुळे..’

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन …

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …