पायीच फिरता येतो ‘हा’ संपूर्ण देश; महिलांच्या हाती का असतात बंदुका?

World News : जगभ्रमंती करण्याचं ज्यांचंज्यांचं स्वप्न आहे त्या सर्वांसाठीच काही देश, काही ठिकाणं कायमच Bucketlist वर असतात. यातलंच एक ठिकाण तेथील अप्रतिम व्यवस्थापन, योग्य तंत्रज्ञानाचा योग्य ठिकाणी केला जाणारा वापर आणि त्यातून देशात पावलोपावली दिसणारी प्रगतीची चिन्हं दर्शवतं. या ठिकाणाचं, या देशाचं नाव आहे इस्रायल. तब्बल 74 वर्षांच्या प्रयत्नांनंतर जगात भारी ठरलेल्या या देशाची आणखी एक ओळख ती म्हणजे येथील संरक्षण यंत्रणा. 

सध्याच्या घडीला सुरु असणारी परिस्थिती पाहता इस्रायलमधील गोष्टींची गणितं चुकल्याचं स्पष्ट होत आहे. पण, (Israel Defense System) जगभरात आजही ‘मोसाद’ची ओळख त्यांच्या कमालीच्या मोहिमांमुळंच आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण इस्रायलचं क्षेत्रफळ इतकं कमी आहे की हा देश पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अवघ्या 2 तासांच पायीच फिरणंही शक्य आहे. वरच्या दिशेनं सुरुवात करत देशाचं खालंच टोक गाठण्यासाठी मात्र 9 दिवसांचा कालावधी लागतो. 

काळाच्या पुढचं इस्रायल 

इस्रायल हा देश आकारानं लहान असला तरीही तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र तो बराच पुढारलेला आहे. 1979 मध्ये या देशानं पहिला अँटीव्हायरस तयार केला होता. घरगुती संगणकांच्या वापराच्या प्रमाणातही हा देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. इतकंच नव्हे, तर पहिली Voice Mail technique सुद्धा याच देशात विकसित झाली आणि वापरली गेली. इस्रायल इतका प्रगत आहे की, इथं 95 टक्के घरांमध्ये सौरउर्जेचा मोठा वापर केला जातो. या देशातील चलनांमध्ये असणाऱ्या नोटांवर ब्रेल मार्किंगही आहे. नेत्रहिन व्यक्तींनाही चलनांची ओळख असावी यासाठीच हा उपक्रम. जगातील सर्वाधिक प्लास्किटका पुनर्वापर करणारा देश हीसुद्धा इस्रायलची आणखी एक ओळख. 

हेही वाचा :  ...तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?

महिलांच्या हाती असॉल्ट रायफल… 

इस्रायल हा देश इतका लहान आहे, की त्याची लोकसंख्या 1 कोटीसुद्धा नाही. 2021 च्या जनगणनेनुसार इथं जवळपास 83 लाख नागरिक देशाचे रहिवासी होते. या देशाचं वेगळेपण म्हणजे इथं महिला आणि पुरुषांना समान अधिकार आहेत. विश्वास बसत नाहीये? इथं लष्करातही महिला आणि पुरुषांची संख्या समप्रमाणातच आहे. 

 

शत्रूराष्ट्रांचा घेराव असल्यामुळं या देशातील प्रत्येक नागरिकाला लष्करी प्रशिक्षण अनिवार्य आहे. शिवाय देशातील प्रत्येक नागरिकानं त्यांच्या जीवनातील किमान 3 वर्षे देशाच्या लष्करी सेवेला द्यावीत असा अलिखित नियम इथं आहे. इस्रायलमधील महिलाही सबळ असून, इथं त्यांच्या हाती अगदी सहजपणे असॉल्ट रायफल पाहायला मिळते. आत्मसंरक्षण आणि आपल्या सोबतच्या व्यक्तींचं संरक्षण हाच त्यामागचा प्राथमिक हेतू असल्याचं सांगण्यात येतं. सध्या इस्रायलमध्ये असंतोष आहे, युद्धाची परिस्थिती आहे. पण, येत्या काळात हे चित्र सुधारेल अशीच आशा आजही अनेकांनी पल्लवित ठेवली आहे. (Israel Palestine Conflict)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …