आधी दोन पतींना सोडलं, तिसऱ्याची हत्या केली अन् नंतर… चौथ्यांदा नवरी होणाऱ्या महिलेला अखेर अटक

Crime News : उत्तर प्रदेशातील (UP Crime) एका तरुणाच्या हत्या प्रकरणाचा उलघडा अखेर बिहारच्या पाटणा पोलिसांनी (Bihar Police) केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी, सासू आणि सासऱ्याने मिळून तरुणाही हत्या केली आहे. गळा दाबून आरोपींनी तरुणाची हत्या केल्याचे समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेचे याआधीही दोनदा विवाह झाला होता. तिसऱ्या पतीची हत्या केल्यानंतर ती चौथ्या लग्नाच्या तयारीत होती. मात्र पोलिसांनी महिलेला अटक केल्यानंतर तिचं बिंग फुटलं आहे. दरम्यान, या हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

मृत सुभाषची पत्नी असमेरी खातून उर्फ ​​मंजू देवी हिने यापूर्वीही दोनदा लग्न केले होते. मृत सुभाष प्रजापतीच्या भावाचे म्हणणे आहे की, त्याच्या वहिणीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध होते आणि तिला चौथ्यांदा लग्न करायचे होते. सुभाषला ही गोष्ट कळताच त्याने याचा विरोध सुरु केला होता. त्यामुळेच मंजूने सुभाषची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष अंमली पदार्थांचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे पत्नीसोबत अनेकदा भांडणे होत होती. याच भांडणातून सुभाषची हत्या करण्यात आली. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष प्रजापती याचा दोन वर्षांपूर्वीच पाटणा येथील असमेरी खातून हिच्याशी विवाह झाला होता. असमेरी खातून हिचे यापूर्वीही दोनदा विवाह झाला होता. दोन्ही पतींना सोडल्यानंतर असमेरीने दोन वर्षांपूर्वी सुभाष प्रजापती यांच्याशी तिसरे लग्न केले होते. असमेरी खातूनने सुभाषला फसवून त्याच्यासोबत लग्न केले. असमेरी खातूनला दोन पतीपासून दोन मुले देखील आहेत, अशी माहिती मृत सुभाषचा भाऊ ब्रिजेश प्रजापतीने दिली.

हेही वाचा :  सरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार

“सुभाषची पत्नी असमेरी खातून हिचे दुसऱ्या मुलासोबत अनैतिक संबंध होते. सुभाषनंतर असमेरी खातून चौथ्यांदा त्याच मुलासोबत लग्न करणार होती. हा सगळा प्रकार सुभाषला समजला होता. याची माहिती मिळताच सुभाषने पत्नी अजमेरी खातूनला हे सगळं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र असमेरी तिच्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. या विरोधामुळे पत्नी असमेरी खातून, सासू अख्तारी खातून आणि सासरे मोहम्मद अलाउद्दीन यांनी मिळून सुभाषचा दोरीने गळा आवळून खून केला,” असा आरोप ब्रिजेश प्रजापतीने केला.

सुभाषच्या हत्येनंतर प्रजापती कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याची पत्नी आणि सासू सासऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करुन आरोपी पत्नी आणि सासू सासऱ्यांना अटक केली आहे. फुलवारी शरीफ पोलीस ठाण्याचे प्रभारी सफिर आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सुभाष प्रजापती याचा मृतदेह शेतात सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांना मृत सुभाषच्या मानेवर जखमा आढळल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरु केला.

सुभाषचा मृतदेह पोलिसांना त्याच्या सासऱ्यांच्या शेतातच मृतदेह सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. शवविच्छेदन अहवालानंतर सुभाषची हत्या झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सासरच्या मंडळींची सखोल चौकशी केली. त्यावेळी असमेरी आणि तिच्या कुटुंबियांनी सुभाषच्या हत्येची कबुली दिली.

हेही वाचा :  गायक, अभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

Maharastra Politics : ‘तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी…’, रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार …