जिथं तुमची विचारशक्ती थांबते तिथेच एलियनचं वास्तव्य; शुक्रावरील रहस्य उलगडा करत NASA च्या वैज्ञानिकाचा दावा

पृथ्वी वगळता इतर ग्रहांवर एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. यासंबंधी वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात येत असतात. पण अद्यापही एलियनचं अस्तित्व सिद्ध करणारा एकही पुरावा सापडलेला नाही. आतापर्यंत फक्त वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यातच आता नासाच्या एका वैज्ञानिकाने शुक्रावर एलियन असू शकतात असा दावा केला आहे. माणसाला सहन न होणाऱ्या शुक्र ग्रहावरील वातावरणात एलियन लपून बसलेले असू शकतात असं या वैज्ञानिकाचं म्हणणं आहे. 

अमेरिकेतील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील संशोधन शास्त्रज्ञ डॉ मिशेल थॅलर यांनी हा नवीन सिद्धांत मांडला आहे. मिशेल थॅलर यांच्या म्हणण्यानुसार, कार्बनडाय ऑक्साईडने भरलेल्या वातावरणात जीवन असण्याची चिन्हं याआधीही दिसली आहेत. ते पाहता कुठेतरी जीवन अस्तित्वात असेल याची खात्री होत आहे. ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ मिशेल थॅलर यांनी यांनी म्हटलं आहे की, शुक्रावरील वातावरणात जीवन असेल याची चिन्हं दिसत आहेत. 

“मला कधीच शुक्रासंबंधी अपेक्षा नव्हती. पण शुक्रावर आता असं वातावरण आहे, जे बॅक्टेरियाद्वारे तयार केले जाऊ शकते असे दिसते,’ असं त्या म्हणाल्या आहेत. शुक्राचा आकार आणि रचना पृथ्वीप्रमाणेच असल्याने त्याला ‘पृथ्वीचा जुळा’ असं म्हटलं जातं. पण तेथील वातावरण पृथ्वीपेक्षा पूर्ण वेगळं आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, शुक्र ग्रहावर माणसाला राहणं अशक्य आहे. 

हेही वाचा :  इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उद्ध्वस्त करणार NASA, जगभरातून निविदा मागवल्या

सूर्यापासून 67 दशलक्ष मैल अंतरावर असलेला, शुक्र हा आपल्या सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. हे तापमान इतकं जास्त आहे की, त्यात शिसे वितळू शकते.

शुक्रावरील वातावरण सल्फ्यूरिक अॅसिड आणि कार्बन डायऑक्साईडपासून बनलेलं आहे. हे मिश्रण या असह्य वातावरणात भर घालतं. यामुळे रनअवे ग्रीनहाऊस इफेक्ट निर्माण होतो.  ज्यामुळे उष्णता बाहेरच्या जागेत जाण्यापासून प्रतिबंधित होते. त्यामुळे तिथे जीवनसृष्टी असेल की नाही यावर शास्त्रज्ञ नेहमीच चर्चा करत असतात. 

अनेकांचा असा सिद्धांत आहे की ग्रहाच्या पृष्ठभागावर प्रकाशसंश्लेषण शक्य आहे कारण शुक्राला त्याच्या दाट ढगांमधून प्रवेश करण्यासाठी पुरेशी सौर ऊर्जा मिळते. पण, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील खगोलजीवशास्त्रज्ञ प्रोफेसर डॉमिनिक पॅपिनो यांनी डॉ मिशेल थॅलर यांची मत वास्तविकतेशी जोडणारी नाहीत असं म्हटलं आहे. 

MailOnline शी बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘जीवनाशी संबंधित रासायनिक प्रतिक्रियांसाठी द्रव पाणी आवश्यक आहे. म्हणून, बाह्य जीवन शोधण्यासाठी, आपल्याला द्रव पाणी शोधण्याची आवश्यकता आहे आणि पृथ्वीबाहेरील जीवाश्म शोधण्यासाठी भूतकाळात द्रव पाण्याशी संबंधित असलेल्या गाळाचे खडक शोधणे आवश्यक आहे. यामुळे शुक्रावर जीवन आहे याची कल्पना करणं कठीण आहे. शुक्रावर भूतकाळात द्रव पाणी होते असा विचार केला तरी त्याचा पृष्ठभाग खूप गरम आहे. 

हेही वाचा :  Umesh Kolhe : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर; NIAने केला महत्त्वाचा खुलासा

दरम्यान 465 लहान लघुग्रह आणि किरकोळ ग्रह वगळता आपल्या सौरमालेत 290 पारंपारिक चंद्र आहेत असं नासाने याआधी सांगितलं आहे. प्रोफेसर पॅपिनेउ यांच्या म्हणण्यानुसार,  “मंगळावर आणि बाहेरील सौरमालेतील बर्फाळ चंद्रांमध्ये आपल्याला अलौकिक जीवन किंवा जीवाश्म सापडण्याची शक्यता आहे. याचं कारण मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फासह त्या ग्रहांवर द्रवरूप पाणी असते. मंगळ आणि बर्फाच्छादित चंद्रांमध्ये देखील एक भूवैज्ञानिक रेकॉर्ड आहे ज्यामुळे जीवाश्म जतन केले जाऊ शकतात”.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …