युक्रेनमधून ३,६८,००० नागरिकांचे पलायन

जीनिव्हा : युक्रेनमधून पळून शेजारच्या देशांमध्ये आश्रयासाठी आलेल्या नागरिकांची संख्या ३ लाख ६८ हजारवर पोहोचली असून ती सतत वाढत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक यंत्रणेने म्हटले आहे.

युक्रेनमधून बाहेर पडून हंगेरी व रुमानियासह इतर देशांमध्ये गेलेल्या स्थलांतरितांची संख्या किमान दीड लाख असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्तांनी शनिवारी सांगितले होते. रविवारी त्यांनी हा अंदाज दुपटीने वाढवला.

पोलंड- युक्रेन सीमेवरील मोटारींची रांग १४ किलोमीटर लांब असून, प्रामुख्याने महिला व मुलांचा समवेश असलेल्या युक्रेनी नागरिकांना रात्रभर गोठवणाऱ्या थंडीत दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली, असे उच्चायुक्तांचे प्रवक्ते ख्रिस मेझेर यांनी सांगितले.

गेल्या ४८ तासांत एक लाखाहून अधिक युक्रेनी नागरिकांनी पोलंड- युक्रेन सीमा पार केली असल्याचे पोलंड सरकारने शनिवारी सांगितले.

६८८ भारतीय नागरिक माघारी

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमधील ६८८ भारतीय नागरिक रुमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एअर इंडियाच्या तीन विमानांतून रविवारी देशात परत आले.

सुमारे १३ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले असून, त्यांना शक्य तितक्या लवकर परत आणण्याचे प्रयत्न सरकार करते आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. शनिवारपासून भारताने तेथे अडकलेल्या आपल्या ९०७ नागरिकांना परत आणले आहे. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत बुखारेस्टहून आलेल्या विमानाने २१९ लोक शनिवारी मुंबईत उतरले.

हेही वाचा :  Chinese Apps Ban: भारताचा चीनला मोठा धक्का! 'या' अ‍ॅप्सवर घातली बंदी, हे आहे कारण

 २५० भारतीय नागरिकांना घेऊन बुखारेस्टहून निघालेले दुसरे विमान रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिल्ली विमानतळावर उतरले. त्यापूर्वी, २४० प्रवासी असलेले तिसरे विमान बुडापेस्टहून निघून सकाळी ९.२० वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. यानंतर १९८ प्रवाशांसह एअर इंडियाचे आणखी एक विमान बुखारेस्टहून निघून सायंकाळी ५.३५ वाजता दिल्ली विमातनळावर उतरले.

रविवारी आणखी दोन विमाने बुखारेस्ट व बुडापेस्ट येथे पाठवण्याची एअर इंडियाची योजना होती.

आहे, मात्र हे सर्व ‘अतिशय तात्पुरत्या स्वरूपाचे’ आहे, असे या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

रविवारी सकाळी शिंदे यांनी बुखारेस्टहून आलेल्या भारतीयांचे दिल्ली विमानतळावर गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

रशियाचे आक्रमण सुरू झाल्यानंतर २४ फेब्रुवारीच्या सकाळपासून युक्रेनचे हवाई क्षेत्र नागरी विमानांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीयांना घेऊन येणारी विमाने बुखारेस्ट व बुडापेस्ट येथून संचालित केली जात आहेत.

The post युक्रेनमधून ३,६८,००० नागरिकांचे पलायन appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण…’, अजितदादांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद …

छ. संभाजी नगरात ‘लापता लेडीज’, गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक

विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजी नगर:  घरातून रागाने, कौटुंबिक कारणातून, पती-पत्नी विसंवाद, अनैतिक …