नारी सबपे भारी! साडी नेसून समुद्रात केले Kiteboarding, महिलेचा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल शाब्बास

Kiteboarding Viral Video: साडी हा स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. असं म्हणतात साडीत महिला सगळ्यात सुंदर दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. स्पोर्टस अॅक्टिव्हिटी करताना किंवा ट्रेकिंग करताना खासकरुन जिम वेअरचा वापर करण्यात येतो. मात्र, एका महिलेने साडी नेसून समुद्रात Kiteboarding केले आहे. हा थरारक व्हिडिओ आणि महिलेचे धाडस पाहून तुम्हीही तिचे कौतुक करेल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

व्हायरल होणारा हा व्हिडिओ तामिळनाडू येथील असल्याचे बोलले जाते आहे. उधाण आलेल्या समुद्रात काइटबॉर्डिंग करणाऱ्या महिलेचे नाव कात्या सैनी असं आहे. कात्याचे धाडस पाहून युजर्सने तिचे कौतुक केले आहे. पारंपारिक भारतीय साडी नेसत तिने तिच्या कलेचे प्रदर्शन केले आहे. कात्याने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचबरोबर साडी नॉट सारी, असंही म्हटलं आहे. ही महिला भारतीय नसल्याचं बोललं जातंय.

कात्या सैनीने साडीत स्पोर्ट्स अॅडव्हेंचर करत तिने एकप्रकारे नवीन आदर्श समाजासमोर ठेवला आहे. तसंच, साडीत स्पोर्ट्स अॅडव्हेंचर करता येत नाही, हा दावाही तिने खोडून काढला आहे. कात्याच्या या धाडसाचे भरभरुन कौतुक होत आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचा हा व्हिडिओ शेअर होतोय. लोक तिच्या या निर्णयाला दाद देत आहेत. 

कात्या सैनी ही प्रोफेशनल  Scuba Diving Instructor आणि IKO Kite Instructor आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत, कात्याने पिवळी साडी नेसली आहे. त्यानंतर काइटबॉर्डिंगसाठी ती तयार होताना दिसत आहे. सेफ्टी गेअर घालून तिने चेन्नईच्या समुद्रात मोठ्या धडाडीने काइटबॉर्डिंगसाठी उतरली आहे. कात्याला Kiteboarding  करताना पाहताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. 

हेही वाचा :  सोप्या पद्धतीनं काढा माशाचा काटा; हा Video पाहून म्हणाल Thank You!

सोशल मीडियावर या व्हिडिओला 6.3 मिलियन व्ह्यू मिळाले आहेत. त्यासोबत 824 k लाइक्स आणि भरपूर कमेंट आल्या आहेत. काहींनी तिने भारताची परंपरा जोपासत धाडस दाखवले आहे, अशी कमेंट केली आहे. तर, एकाने कोण म्हणत साडी नेसणाऱ्या महिला फक्त जेवण बनवतात, अशी कमेंट केली आहे. तसंच, साडीतही तिने सुंदररित्या तिचे कौशल्य दाखवलं आहे, असं म्हणत तिचे कौतुक केले आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …