बायोडेटा रेडी ठेवा! आरोग्य विभागात उद्यापासून 11000 पदांची मेगा भरती; आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांची मोठी घोषणा

Maharashtra Health Department Recruitment 2023 : येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या शिक्षण खात्यानंतर आता आरोग्य विभागात मेगा भरती होणार आहे. उद्यापासून भरती होणार असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी केली आहे. 

आरोग्य विभागाता 11 हजार पदांची भरती 

राज्याचा आरोग्य विभागत उद्यापासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.  आरोग्य विभागाता 11 हजार पदांची मेगा भरती होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया रखडली आहे. राज्याच्या आरोग्य खात्यात अनेक पदे रिक्त आहेत. याचा परिणाम आरोग्य विभागावर होत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळेच सरकारने तातडीने आरोग्य विभागात 11000 पदांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील पद भरली जाणार

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11 हजार पदासाठी ही जाहिरात काढली जाणार आहे. रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जाणार आहेत. गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश असेल. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे.

हेही वाचा :  परिचारिका भरतीसाठी आलेल्या महिलांना जमिनीवर बसवले; ठाणे महानगरपालिकेतील अजब प्रकार

ठाण्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य खात्याच्या भरती प्रक्रियेला वेग

ठाण्यातील कळवा येथील सरकारी रुग्णालयात 10 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.  रुग्णलयात पुरेशे मनुष्यबळ नसल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर सरकारला जाग आल्यानंतर भरती प्रक्रियेला वेग आला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …