पत्नीला मूल होत नसल्याने पतीच झाला गर्भवती, 9 महिने गर्भातही वाढवलं; डॉक्टरही हैराण

Husband Gave birth to child: युकेमध्ये पित्यानेच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. जोडीदार बाळाला जन्म देण्यासाठी वैद्यकियरित्या तंदरुस्त नसल्याने त्याने हा निर्णय घेतला. पत्नी गर्भवती होऊ शकत नसल्याने, व्यक्तीने आपल्या गर्भात बाळाला वाढवलं आणि ते जन्मालाही घातलं. हे वृत्त समजल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. एक वडील मुलाला कसा काय जन्म देऊ शकतो? गर्भाचा आणि बाळ वाढवण्याचा काय संबंध? असे अनेक प्रश्न लोक विचारत आहेत. पण 27 वर्षीय सेलेब बोल्डनने खरंच असं केलं आहे. त्याची 25 वर्षीय पत्नी नियाम बोल्डन गर्भवती होऊ शकत नव्हती. 

यामागील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सेलेब बोल्डन एक ट्रांसजेंडर पुरुष आहे. तो एक महिला होता आणि पुरुष होण्यासाठी उपचार करत होता. अद्यापही त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचं शरीर आता बऱ्यापैकी पुरुषांप्रमाणे झालं आहे. पण जेव्हा त्याला नियाम गर्भवती होऊ शकत नाही याची माहिती मिळाली असता त्याने काही वेळासाठी आपले उपचार थांबवले. त्याने गर्भवती होत बाळाला जन्म दिला. आता तो पुढील उपचार करणार आहे. त्यांनी मुलीचं नाव इलसा राए ठेवलं आहे. सेलेबने म्हटलं आहे की “मला ट्रान्सजेंडर लोकांना सांगायचं आहे की, मूल असणं काही चुकीची गोष्ट नाही”.

हेही वाचा :  जय भवानी, जय शिवाजी...! बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

तीन वेळा नियामचा गर्भपात

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, नियामचा तीन वेळा गर्भपात झाला होता. 23 व्या आणि 27 व्या आठवड्यात तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. पण जन्मताच त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर डॉक्टरांनी नियामला तू पुन्हा गर्भवती होऊ शकत नाहीस असं सांगितलं होतं. हे कुटुंब इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये राहतं. 

अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर सेलेबने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्याने गर्भवती न होण्यासाठी घेतलं जाणं टेस्टोस्टेरोन इंजेक्शन बंद केलं. एका ट्रान्सजेंडर पित्यासाठी हा फार कठीण निर्णय होता. 2017 पासून त्याने लिंगबदलाचे उपचार सुरु केले होते. तो एक स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतो. 

सेलेबने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, हा फार वेदनादायक अनुभव होता. मला लहानपणासूनच जेंडर बदलण्याची इच्छा होती. पण माझ्या जोडीदाराच्या अपेक्षांचीही मला कल्पना होती. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला.

सेलेबने 2022 मध्ये इंजेक्शन घेणं बंद केलं. 27 महिन्यांपासून तो हे इंजेक्शन घेत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्पर्म डोनरची भेट घेतली. सहा महिने आणि तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर सेलेब गर्भवती झाला. यावेळी त्याला कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मिळाला. काहींनी तर पुरुष गर्भवती होऊ शकत नाही असंही म्हटलं. पण सेलेबने हे करुन दाखवलं. मे 2023 मध्ये त्याने एका मुलीला जन्म दिला. 

हेही वाचा :  जिम जॉईन करण्याआधी Health Checkup केल्यामुळे टळू शकतो Heart Attack चा धोका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …

राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. …