IND vs SL : धक्कादायक बातमी..! श्रीलंका संघाची ने-आण करणाऱ्या बसमध्ये आढळले…


याप्रकरणी संबंधित बसचालकाची चौकशी करण्यात येत आहे.

श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० मालिका खेळवली जात आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना पंजाबमधील मोहाली येथे होणार आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेचा कसोटी संघ मोहालीत आहे.

श्रीलंकेचा संघ मोहाली स्टेडियमवर दररोज सराव करत आहे. दरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (२६ फेब्रुवारी) पोलिसांनी नियमित तपासणीदरम्यान श्रीलंकन ​​खेळाडूंच्या बसमधून दोन रिकामे खोके (bullet shells) जप्त केले. हे खोके बंदुकीला लागणाऱ्या काडतुसांचे होते. या बसमधून लंकेच्या खेळाडूंना दररोज हॉटेलमधून स्टेडियममध्ये सरावासाठी आणले जाते.

हेही वाचा – IND vs SL : मैदानात उतरताच हिटमॅन बनला टी-२० क्रिकेटचा नवा बादशाह! पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

या प्रकरणी अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, फक्त डीडीआर नोंदवण्यात आला आहे. या घटनेबाबत संबंधित बसचालकाची चौकशी करण्यात येत आहे. ही खासगी बस चंदीगडच्या सेक्टर १७च्या तारा ब्रदर्स या कंपनीकडून भाड्याने घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याआधी ही बस एका लग्नासाठी बुक करण्यात आली होती. पंजाबमध्ये लग्नसमारंभात जल्लोषात गोळीबार होत असतो, त्यामुळे त्यादरम्यान हे खोके बसमध्ये राहिले असावेत, असा तर्क लावला जात आहे.

हेही वाचा :  Shane Warne Died : शेन वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा ; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सेहवागसह अनेकांकडून शोक व्यक

टीम इंडियाला पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना ४ मार्चपासून मोहालीत होणार आहे. यानंतर दुसरा सामना १२ मार्चपासून बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा शेवटचा सामना पिंक बॉल टेस्ट म्हणजेच डे-नाईट असेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …