IMDb Rating : आयएमडीबीने घटवले ‘द काश्मीर फाईल्स’चे रेटिंग! कारण देताना म्हणाले…

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेच, पण चित्रपटाला आयएमडीबी रेटिंगही (IMDb Rating) 10 पैकी 10 होते. पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने 27.15 कोटींचा व्यवसाय केला आहे. एकीकडे चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळत असताना, दुसरीकडे IMDb ने मात्र, चित्रपटाचे रेटिंग कमी केले आहे. ‘Unusual Voting Activity’चं कारण देत हे रेटिंग कामी करत असल्याचे स्पष्टीकरण IMDbने दिले आहे.

अक्षय कुमार, कंगना रनौत, परिणीती चोप्रा, आर माधवन आणि परेश रावल अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. चित्रपटाला IMDb वर 10/10 रेटिंग देखील होते. एखाद्या चित्रपटाला 10 पैकी 10 रेटिंग मिळणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. IMDb चे रेटिंग अतिशय विश्वासार्ह मानले जाते, कारण ते प्रेक्षकांचे फीडबॅक आणि रेटिंगची सरासरी संख्या आहे.

IMDb ने स्वतः रेटिंग कमी केले?

एका चाहत्याने ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ट्विट टॅग करत लिहिले की, #TheKashmirFilesचे IMDb पेजवर असे सांगण्यात येत आहे की, त्यांच्या रेटिंग यंत्रणेला Unusual Voting Activity दिसून आली आहे. त्यांनी रेटिंग सिस्टमची विश्वासार्हता राखण्यासाठी, त्यावर पर्यायी गणना लागू केली आहे.’ चाहत्याने सांगितले की, IMDbने स्वतः चित्रपटाचे रेटिंग घटवले आहे.

हेही वाचा :  Khayyam Birth Anniversary : आपली संपूर्ण संपत्ती दान करणारा संगीतकार

विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

या पेजने अहवालात म्हटले आहे की, या चित्रपटासाठी 131,433 मते मिळाली आहेत आणि Unusual Voting Activityमुळे चित्रपटाला आता 8.3 रेट केले गेले आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, खर्‍या अर्थाने आता हे कृत्य असामान्य आणि अनैतिक आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेक कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत राहिला आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://youtu.be/Rs3GfkHRwXA

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …