केंद्र सरकारकडून महिलांना 6000 रुपये, लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज !

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023: केंद्र सरकारने महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत  पहिल्या मुलानंतर 5000 रुपये तर दुसऱ्या मुलीनंतर 6000 रुपये देत आहे. माता आणि बालमृत्यू कमी करण्याबरोबरच भ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने मातृ वंदना योजना राबविली जाते. आपल्या पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातात, तर दुसरी मुलगी झाली तर थेट सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. 

दरम्यान, सुरुवातीला तीन टप्प्यात योजनेची रक्कम थेट खात्यात जमा  केली जात होती. आता दोन टप्प्यातच पाच हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी तीन टप्प्यात तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर योजनेचा लाभ दिला जात होता.

गर्भधारणा झाल्यापासून सरकारी आरोग्य यंत्रणेला याबाबत कळविल्यापासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होते. सरकारी रुग्णालयात प्रसूतीपूर्व एकदा तपासणी झाली की, दुसरा टप्पा बाळाच्या पहिल्या लसीकरणानंतर दिला जातो. पहिला हप्ता तीन हजारांचा तर दुसरा हप्ता दोन हजारांचा लाभ मातांना दिला जातो. शहरी महिलांसाठी महापालिका आरोग्य विभाग ही योजना राबवत आहे.

हेही वाचा :  Bank Job: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, पदवीधरांनी 'या' पत्त्यावर पाठवा अर्ज

नियमावलीत सुधारणा

मातृ वंदना योजनेत आता सुधारणा करण्यात आली असून दुसरे अपत्य झाल्यानंतर 270 दिवसात अर्ज करता येणार आहेत. योजनेसाठी बाळाच्या पित्याच्या आधार कार्डाची अट रद्द केली आहे.

निकष काय?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील महिलांना घेता येईल. मात्र, सरकारी सेवेत मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

दुसऱ्या अपत्यानंतर 6000 हजार रुपये

दुसरे अपत्य मुलगी झाली तर मातेला एकरकमी सहा हजार रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार आहे. मात्र, दुसरे अपत्य हे मुलगीच हवी.

पहिला हप्ता 3000 रुपयांचा

यापूर्वी तीन हप्त्यात लाभ मिळत होता. दोन हप्त्यात लाभ मिळणार आहे. प्रसूतीपूर्व तपासणीनंतर तीन हजारांचा हप्ता थेट खात्यावर जमा होणार आहे.

दुसरा हप्ता 2000 रुपयांचा

बाळ जन्माला आल्यानंतर योजनेचा दुसरा हप्ता दिला जातो. बाळ जन्माला आल्यानंतर दोन हजारांचा हप्ता मातेच्या खात्यावर डीबीटीने जमा केला जातो.

काय आहे ही योजना?

माता मालकांच्या आरोग्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2017 पासून देशात सुरु आहे. माता – बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी योजना राबविली जात आहे. अनुसूचित जाती, जमाती तसेच दारिद्ररेषेकखालील मातांसाठी योजना लाभदायक ठरत आहे.

हेही वाचा :  ठाणे पालिकेचा भूखंड घोटाळा? | Thane Municipal Corporation plot scam policy low rate ysh 95

मोबाईलवरुन अर्ज करु शकता

प्रधानमंत्री मातृ वंदना योजेचा अर्ज आता थेट तुमच्या मोबाईलवरुनही भरु शकता. सरकारने ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. मोबाईलद्वारे मातांना नोंदणी करता येणार आहे.

 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी पात्रता

 या योजनेसाठी गरोदर महिला अर्ज करु शकते. जी महिला 19 वर्षांपासून अधिक असेल तर या योजनेचा लाभ मिळू शकेल.
ही योजना ज्या महिला 1 जानेवारी 2017 नंतर गरोदर असतील, त्यांना यो योजनेचा लाभ होईल.

 PMMVY योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

– आई – वडील यांचे आधार कार्ड
– आई – वडील ओळख पत्र
– मुलांचे जन्म दाखला
– बँकेचे पासबुक



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत..’; ‘मोदी एकाकी, मनाने कमजोर पडले’

Rahul Gandhi PM Modi Verbal Fight: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या विधानांवरुन उद्धव ठाकरे …

‘..याचा अर्थ स्वयंप्रभू मोदी व त्यांचे भक्त देवेंद्र ‘मुजरा’ करीत होते’; ठाकरे गट म्हणाला, ‘4 जूननंतर..’

PM Modi Election Campaign Comments: “निवडणुका संपताच नरेंद्र मोदी यांच्यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे,” …