आई – बाबा! UPSC परीक्षेत बाजी मारणाऱ्या मराठमोठ्या तरुणाने दोन शब्दात दिले अवघड प्रश्नाचे उत्तर

UPSC Maharashtra Topper:  संगमनेरच्या एका चहावाल्याचा मुलगा यूपीएससी उत्तीर्ण झाला आहे. मंगेश खिलारे (Mangesh Khilere) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. मंगेशची आई विडी कामगार आणि वडील चहाचा ठेला चालवतात. संगमनेरजवळच्या सुकेवाडी गावातून मंगेशनं शिक्षण घेतलs. मोलमजुरी करत, उसने पैसे घेत त्याच्या आईवडिलांनी त्याचं शिक्षण पूर्ण केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 396 वा येत मंगेश यूपीएससी उत्तीर्ण झाला. UPSC परीक्षेत बाजी मारत मंगेशने आई वडिलांच्या कष्टांचे चीज केले आहे. 

मंगेश 396 व्या रँकने उत्तीर्ण

यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालामध्ये मंगेश 396 व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. मंगेशने हे यश कसं मिळवलं, त्याचा जीवनातील आदर्श कोणता, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सोशल मीडियापासून दूर राहणं किती आवश्यक त्याचप्रमाणे त्याला मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेला सर्वात चांगला प्रश्न कोणता होता या सगळ्यांविषयीची त्याने मुलाखतीत दिलखुलास उत्तर दिली आहेत. 

हेही वाचा :  15 वर्षाच्या बहिणीने आपल्याच 12 वर्षाच्या भावाची गळा दाबून केली हत्या; कारण ऐकून पालकांसह पोलीसही हादरले

मंगेश अवघा 23 वर्षांचा आहे. यूपीएससीसाठी तयारी करत असताना तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळवल आहे. विशेष म्हणजे शासकीय नोकरीत या उच्च पदाला गवसणी घालणारा मंगेश हा त्याच्या कुटुंबातील पहिलाच मुलगा आहे. त्यामुळे त्यांनं मिळवलेल्या या यशाचं त्याच्या घरच्यांबरोबरच गावाकडील सगळ्यांनाच कौतुक आहे. 

पहिला फोन आई वडिलांना

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून मंगेश पुण्यात आला होता. पुण्यातील युनिक अकॅडमीचा तो विद्यार्थी आहे. मुलगा कुठल्यातरी मोठ्या परीक्षेची तयारी करतोय यापेक्षा त्याच्या आईला फारसं काही माहीत नाही किंबहुना कळतही नाही. समाजात वावर असल्यानं असल्यानं वडिलांना स्पर्धा परीक्षा आदींची जेमतेम माहिती आहे. मुलगा यूपीएससी परीक्षा पास झाल्याचं कळतात त्यांना खूप आनंद झाला. निकालाची यादी वेबसाईटवर धडकतात मंगेशन पहिला फोन त्यांनाच केला. हा प्रसंग खिलारे कुटुंबासाठी अच्युतम आनंदाचा होता.

वडिल चहा विकतात, आई बिड्या वळते

मंगेशची आई विडी कामगार आहे. विड्या वळणे किंवा बांधण्याचं काम त्या करतात. त्या कामातून दिवसाकाठी 100 ते 200 रुपये मिळतात. घरी थोडीशी शेती आहे. परंतु उत्पन्न नावालाच. त्यामुळे मंगेश चे वडील चहाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळतात.  

हेही वाचा :  बिकिनी वॅक्समुळे खरंच योनीमार्गाची स्वच्छता होते का? डॉक्टरांनी सांगितले सत्य

आई-वडील हेच आपले आदर्श

घरी असलेली बिकट आर्थिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आई-वडील करत असलेले काबाडकष्ट हेच मंगेशच्या यशामागील प्रेरणा म्हणता येतील. त्याने संघर्ष केवळ पाहिला नाही तर तो प्रत्यक्ष अनुभवलाय. असं असलं तरी मंगेशच्या आई-वडिलांनी त्याला किंवा त्याच्या बहिणीला कधीच विड्या बांधण्यासाठी बसवलं नाही. त्याऐवजी त्यांनी मुलांच्या हातात पाटी पेन्सिल दिली. त्यामुळे आपले आई-वडील हेच आपले आदर्श असल्याचं मंगेश अभिमानांना सांगतो. 

यूपीएससीची तयारी करत असताना प्रयत्नांमधील सातत्य महत्त्वाचं

यूपीएससीची तयारी करत असताना प्रयत्नांमधील सातत्य महत्त्वाचं असतं. अभ्यास करत असताना संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास डोळ्यासमोर ठेवायचा असतो. मंगेशनं त्याकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. अपयश आलं तरी खचून जायचं नाही, जिद्द सोडायची नाही, आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही हाच सल्ला मंगेश त्याच्या मित्र-मैत्रिणींना देतो. 

सोशल मीडियापासून दूर रहावे

अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आपल्या लक्ष्यापासून विचलित होत असल्याचं आवर्जून आवर्जून जाणवतं. सोशल मीडिया आहे त्यामागचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे मुलांनी सोशल मीडियाचा मर्यादित वापर करावा किंबहुना त्यापासून दूर राहावं असा सल्ला मंगेश देतो.

हेही वाचा :  पायावर काळे-निळे चट्टे उठले, डॉक्टरांनाही निदान सापडलं नाही, अखेर नऊ दिवसांनी मुलीचा मृत्यू

ग्रामविकासमध्ये काम करण्याची इच्छा

यूपीएससीचं क्षेत्र खूप विस्तीर्ण असं आहे. आयएएस झाल्यानंतर सेवेचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. मंगेशला त्यातील ग्रामविकास मध्ये रस आहे. मातीशी नाळ जोडून असणं म्हणतात ते हेच. तुझ्या जीवनातील आदर्श कोण, असा प्रश्न मंगेशला मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आला होता. मंगेशचं उत्तर होतं, ” माझे आई – बाबा “.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला ‘त्यांना…’

राजस्थानचे माजी मंत्री आणि भरतपूरच्या राजघराण्यातील सदस्य विश्वेंद्र सिंह यांनी पत्नी आणि मुलाविरोधात गंभीर आरोप …

MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला

अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अमरावतीतल्या माला पापळकर या तरुणीने …