लज्जास्पद! NEET 2023 परीक्षेला जाण्याआधी मुलींना उघड्यावर बदलावी लागली अंतर्वस्त्र

NEET 2023 : सांगलीमध्ये (Sangli News) पार पडलेल्या नीट परीक्षेदरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रामध्ये आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्रे उलटी करुन घालायला लावल्याचे सांगण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशाच परिस्थितीमध्ये विद्यार्थिनींना परीक्षा द्यायला लावण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (NTA) तक्रार केली आहे.

रविवारी देशभरात नीट परीक्षा पार पडली. एजन्सीने रविवारी 20 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी 4,000 केंद्रांवर अंडरग्रॅजुएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट 2023 आयोजित केली होती. परीक्षेपूर्वी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सांगितले होते की परीक्षा केंद्रावरील कर्मचार्‍यांना महिला उमेदवारांची तपासणी करण्यासाठी सर्वसमावेशक सूचना जारी करेल. मात्र या परीक्षेदरम्यान देशभरात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयाती परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांना कपडे उलटे करुन घालण्यास सांगितले होते. परीक्षेला आलेल्या विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना कपडे उलटे घालायला लावल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

“परीक्षा संपल्यानंतर मुलीला घ्यायला गेलो होतो. परीक्षा केंद्रावरुन बाहेर आल्यावर कपडे उलटे का घातले असे विचारले. तर मुलीने सांगितले की, परीक्षा केंद्रावर चेकिंग सुरु असताना सगळ्यांना कपडे काढून उलटे करुन घालायला सांगितले. मुलांच्या बाबतीत सुद्धा असे करायला सांगितले होते. त्यानंतरच आम्हाला परीक्षेला बसू दिले,” अशी माहिती विद्यार्थीनीच्या पालकांनी दिली.

हेही वाचा :  Sharaddha Walkar Murder Case : आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले, प्रत्येक खूनी मनोरूग्ण असतो का?

पश्चिम बंगालमध्येही असाच काहीसा प्रकार घडल्यानंतर एका विद्यार्थ्यांनीने याबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. “अनेक उमेदवारांना त्यांची पॅंट बदलण्यास किंवा त्यांची अंतर्वस्त्रे दाखवण्यास सांगण्यात आले होते. अनेक विद्यार्थिनींनी त्यांच्या जीन्सची त्यांच्या आईच्या लेगिंग्सशी अदलाबदल केली होती. परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला एकही दुकाने नसल्यामुळे मुलींना असे करावे लागले. मुलींना मुलांबरोबर मोकळ्या खेळाच्या मैदानात त्यांचे कपडे बदलावे लागले,” असे एका मुलीने म्हटलं आहे.

दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या घटनेच्या बाबतीत एनटीए अधिकाऱ्याने आरोप नाकारले आहेत. तर सांगली येथील केंद्राबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, काही निरिक्षकांना काही मुली अशा आढळल्या की ज्यांच्या कुर्तीवर काहीतरी लिहिलेले होते. म्हणून, कदाचित सुरुवातीला त्यांचे टॉप बदलून घालण्यास सांगितले गेले होते. पण नंतर ते थांबवले गेले. आम्ही याबाबत एजन्सीकडून निवेदन मागितले आहे.”

दरम्यान, घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे मत पालकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. या घटनेबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे काही पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. अशा प्रकारची तपासणी करून विद्यार्थ्यांना विशेषता मुलींना उलटे कपडे घालायला लावणं हे कितपत योग्य आहे ? आणि ते कोणत्या चौकटीत बसतं? या शिवाय कपडे बदलण्याच्या बाबतीत मुलींच्या सुरक्षेची कितपत काळजी घेतली गेली ? हा देखील प्रश्न आहे. या सर्व प्रकारानंतर नीटच्या कारभावर संतप्त पालकांडून सवाल उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा :  Balasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …